Type Here to Get Search Results !

तुम्ही आम्हालाच काय, अधिकाऱ्यांनाही भेटत नव्हता:निलम गोऱ्हेंची उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका, कवितांना दिले 'गोंधळा'ने प्रत्युत्तर

विधान परिषदेतील आपल्या सहा वर्षांच्या कार्यकाळाचा समारोप करताना उद्धव ठाकरे यांनी कवितांच्या माध्यमातून आपली खंत व्यक्त केली. मात्र, त्यांच्या या भाषणातील उपरोधिक टोलेबाजीवर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आक्रमक पवित्रा घेत जोरदार पलटवार केला. "ज्यांनी तुम्हाला सोडून जाण्याचा निर्णय घेतला, तो का घेतला याचा कधी विचार केला आहे का? तुम्ही केवळ आम्हालाच नाही तर अधिकाऱ्यांनाही भेटत नव्हता. माझ्या या विधानामुळे मला ट्रोल केले जाईल किंवा मी लोकांच्या निशाण्यावर येईल याची मला जाणीव आहे. पण सत्य बोलणे आता गरजेचे झाले आहे," अशा शब्दांत गोऱ्हेंनी ठाकरेंचा समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेच्या ९ आमदारांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज अधिवेशनात या विधान परिषद सदस्यांना निरोप देण्यात आला. यावेळी आपल्या निरोप समारंभाच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ कवी सुरेश भट आणि विंदा करंदीकर यांच्या कवितांचा आधार घेतला. 'केले कुणास्तव ते किती, ते मोजू नये...' या ओळींचा संदर्भ देत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. "ज्यांना मोठे केले, तेच सोडून गेले," अशी भावना व्यक्त करत त्यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली. उद्धव ठाकरे यांच्या अखेरच्या भाषणावर निलम गोऱ्हे तुटून पडल्या. नेमके काय म्हणाल्या निलम गोऱ्हे? उद्धव ठाकरे यांनी अनेक कविता वाचून दाखवल्या. ती कविता ही त्यांच्या बाबतीतच होती, असा टोला निलम गोऱ्हे यांनी लगावला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळी आम्हाला बरे वाटले. पण शेवटच्या १ वर्षात आमचा भ्रमनिरास झाला. हे वर्ष वर्ष कुणाला भेटत नव्हते. तिथ गेले की लक्षात यायचे की त्यांना आम्ही नको आहोत. काही झाले की सोडून गेले... सोडून गेले... पण का सोडून गेले त्याचा विचार करा ना... अशा शब्दांत निलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला. कोविडमध्ये शिंदेसाहेब देखील काम करत होते उद्धव ठाकरे आम्हाला तर भेटत नव्हतेच पण उद्धव ठाकरे अधिकाऱ्यांना देखील भेटत नव्हते, असा दावा निलम गोऱ्हे यांनी केला. मिलिंद तर आमच्या सारख्या कोरोना टेस्ट करायचा. कोविडमध्ये काम केले असे ते म्हणतात. अहो पण शिंदेसाहेब देखील काम करत होते. त्यांनी पिपीई किट घालून काम केले ना.... ते म्हणाले रेडा कापला.. अहो तुम्ही श्रद्धेच्या नावाने काय काय करत होतात, हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, असा टोलाही निलम गोऱ्हे यांनी लगावला. उद्धव ठाकरेंच्या कवितांना 'गोंधळा'ने उत्तर उद्धव ठाकरे यांनी कविता वाचून दाखवल्यानंतर नीलम गोऱ्हे यांनीही एका गोंधळाच्या ओळींनी त्यांना उत्तर दिले. लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा मी पणाचा दिमाख तुटला अंतरंगी आवाज उठला, ऐरणीचा सवाल सुटला या कहाणीचा

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/AB2cwaM

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.