राज्याच्या हवामानात पुन्हा मोठा बदल होत असून रविवारी दुपारनंतर दक्षिण मराठवाडा व उत्तर खान्देशात पावसाळी स्थिती निर्माण होईल, तर 20 ते 22 एप्रिलदरम्यान राज्याच्या बहुतांश भागांत वादळी पावसाचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने हा इशारा ट्वीट केला आहे. त्यानुसार, मराठवाडा, विदर्भ, खान्देश व पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहून 21 जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह गारपीट शक्य आहे. दरम्यान, शनिवारी राज्यात 14 जिल्ह्यातील तापमान 40 अंशाहून जास्त होते. वर्धा देशात उष्ण ठिकाण ठरले. मराठवाडा, विदर्भात पावसाचा जोर जास्त 20 आणि 21 एप्रिलला प्रामुख्याने पुणे विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग (विशेषतः बीड, लातूर, नांदेड) व विदर्भातील अमरावतीत वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी असेल. या भागात मेघगर्जनेसह अचानक पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज आहे. नगरच्या पारनेरमध्ये महिलेचा उष्माघाताने मृत्यू पारनेर | अहिल्यानगरातील पारनेर तालुक्यातील माळवाडी (ढवळपुरी) येथे जनावरांसाठी चारा आणण्यासाठी शेतात गेलेल्या हर्षदा रावसाहेब चौधरी (46) या महिलेचा शनिवारी दुपारी उष्माघाताने मृत्यू झाला. कडक उन्हात मका कापत असताना चक्कर येऊन त्या बेशुद्ध पडल्या. त्यांना तातडीने जखणगाव येथील रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. चौधरी कुटुंबाचा मोठा दूध व्यवसाय असल्याने हर्षदा नेहमीप्रमाणे दुपारी 1 वाजता जनावरांच्या चाऱ्यासाठी मका आणण्यासाठी शेतात गेल्या होत्या. वर्धा देशात सर्वात उष्ण वर्धा 45.0 नागपूर 44.2 अमरावती 44.0 चंद्रपूर 43.4 अकोला 43.3 गोंदिया 43.2 सोलापूर 42.4 परभणी 42.2 जळगाव 41.4 धाराशिव 41.4 अहिल्यानगर 41.1 बीड 41.1 संभाजीनगर 40.6 सांगली 40.0 पुणे 39.6 नाशिक 39.1
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/gu50LvX
उद्यापासून 3 दिवस राज्यात वादळी पावसाचा ‘अलर्ट’:आज मराठवाड्यात पावसाची स्थिती, वर्धा ठरले देशातील उष्ण ठिकाण
April 18, 2026
0