Type Here to Get Search Results !

शेतीचा वादातून कर्नाटक सीमेवरील गोविंदपूर येथे 6 जणांना गोळ्या घातल्या:मृतांत एकाच कुटुंबातील 5 जण

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील चडचण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भीमा नदीकाठावरील गोविंदपूर (जि. विजयपूर) गावात शुक्रवारी दुपारी हत्याकांड घडले. यामध्ये ६ जणांची हत्या करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी शेतात येऊन आधी गोळीबार केला आणि नंतर शस्त्रांनी वार केले. मृतांपैकी पाच जण चडचणमधील एकाच कुटुंबातील आहेत, तर इतर दोघे गंभीर जखमी आहेत. दुंडप्पा रेवणसिद्धप्पा निराळे (६५), शिवपुत्र निराळे (५८), चंद्रकांत उर्फ चंदू निराळे (५५), राहुल शिवपुत्र निराळे (२५), समर्थ शिवपुत्र निराळे (२३, सर्व रा. चडचण, जि. विजयपूर) व शब्बीर बाबूसाब अत्तार (४५, रा. चडचण) अशी मृतांची नावे आहेत. तर, अरविंद यशवंत कटगे (७२, रा. दसूर) व जेसीबी चालक संदीप भारत माने (३४, रा. कात्राळ, ता. मंगळवेढा)हे दोघे जखमी झाले आहेत. शुक्रवारी दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास निराळे कुटुंबाने गोविंदपूरमध्ये घेतलेल्या शेतात ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता असून सीमाभागातील नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच विजयपूर व चडचण पोलिसांचा मोठा फौजफाटा गावात दाखल झाला असून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके तयार केली. मृतदेह व जखमींना विजयपूर येथील बीएलडीई रुग्णालयात हलवले.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/gHJO90G

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.