येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डॉक्टर लेन शाखेत खातेदारांनी तारण ठेवलेले ८१ तोळे सोने, कॅश इन्चार्जआणि सर्व्हिस मॅनेजरने लांबवल्याचा प्रकार समोर आलाआहे. बँकेतील खरे सोने काढून घेत दोघांनी त्याजागीबनावट सोने ठेवून अपहार केला. याप्रकरणी वजिराबादपोलिस ठाण्यात गुन्हा दोघांवर गुन्हा दाखल झाला.दोघांनी लांबवलेल्या सोन्याची किंमत तत्कालीनबाजारभावानुसार ८५ लाख ८१ हजार ५९७ रुपयेअसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. स्टेट बँक ऑफ इंडियाची नांदेडमध्ये डॉक्टर लेनभागात शाखा आहे. या शाखेत ग्राहकांनी कर्जघेण्यासाठी सोने तारण म्हणून ठेवले होते. ८ ग्राहकांनीतारण ठेवलेले ८०५.९० ग्रॅम सोने दोघांनी लांबवले. कॅश इन्चार्ज आदित्य प्रकाश सेनगावकर आणि सर्व्हिसमॅनेजर जीवन माधवराव जगदाळे यांनी संगनमत करूनहा अपहार केला. दोघांनी बँकेच्या लॉकरमधील खरे सोने लंपास करून त्या ठिकाणी बनावट सोने ठेवले. १८ मेपूर्वीहा प्रकार घडल्याची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणात बँक कॅश इन्चार्ज आदित्य सेनगावकर आणि सर्व्हिस मॅनेजर जगदाळे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखलझाला. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डॉक्टर लेन शाखेचेमुख्य शाखा व्यवस्थापक राजीव कदम यांनी वजिराबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अंबड, बदनापूरनंतर नांदेडमध्ये घडलेली तिसरी घटना खातेदारांनी तारण ठेवलेल्यासोन्याच्या मूळ दागिन्यांच्यापाकिटांमध्ये नकली सोने ठेवून ९६लाखांचा अपहार केल्याचा प्रकारअंबडमधील मोतीराम अग्रवालजालना मर्चंट बँकेत २९ एप्रिललाउघडकीस आला होता. यात २४खातेदारांची फसवणूक झाली. याप्रकरणी बँक अधिकाऱ्यांसहसंचालक मंडळावर गुन्हा दाखलझाला आहे. तसेच बदनापूर येथीलकॅनरा बँकेतही २७ एप्रिलला असाप्रकार घडला होता. ३.५२ कोटींचेतारण ठेवलेले सोने चोरून, त्याजागीबनावट सोने ठेवून २२ ग्राहकांच्यानावे ३.५० कोटींचे कर्ज देण्यात अालेहोते. यात शाखा व्यवस्थापक विजेंद्रपाटणकर व सोने प्रमाणित करणाराप्रवीण बुऱ्हांडे हे दोघे बँक कर्मचारीअटकेत आहेत. असा उघडकीस आला बँकेतील अपहाराचा प्रकार बँकेच्या एका खातेदाराने सोने तारणठेवून घेतलेल्या कर्जाची परतफेडकेली होती. त्यामुळे आपले सोनेबँकेतून परत घेण्यासाठी हा खातेदारगेला असता, तारण ठेवलेल्यासोन्याच्या दागिन्यांऐवजी त्यालाबनावट दागिने परत मिळाले.खातेदाराने ही बाब बँकेच्याअधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर त्यांनीतपासणी केली. त्यावेळी खऱ्यासोन्याच्या ऐवजी बनावट सोनेठेवल्याचा प्रकार समोर अाला.त्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनीपोलिसांत तक्रार दिली. संबंधितांनीसोन्याचे पुढे काय केले, याचा तपासपोलिस करत आहेत. दिव्य मराठी नॉलेज - बँकेकडे असतो सोन्याचाविमा, त्यातूनच भरपाई प्रत्येक बँकेकडे लॉकरमध्ये किंवास्ट्रॉँग रूममध्ये ठेवलेल्या मौल्यवानवस्तूंचा आणि दागिन्यांचा विमाअसतो. बँक या विम्याच्या आधारेविम्याच्या रकमेसाठी क्लेम करते.त्यातून खातेदारांना त्यांच्या सोन्याचीपूर्ण भरपाई मिळते.
आरबीआयच्या नियमांनुसार,फसवणुकीमुळे ग्राहकाचे नुकसानझाल्यास त्याची पूर्ण जबाबदारीबँकेची असते. सोन्याच्या चालूबाजारभावानुसार मूल्यांकनाचीरक्कम ग्राहकाला दिली जाते. यारकमेतून ग्राहकाने घेतलेल्या कर्जाचीरक्कम वजा केली जाते. काहीप्रकरणांमध्ये बँक ग्राहकालातितक्याच वजनाचे सोने देऊ शकते.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/cwEVOGa
बँकेत तारण ठेवलेले खरे सोने काढून बनावट ठेवले:85 लाखांचा अपहार, दोन कर्मचाऱ्यांचा सहभाग; नांदेडला स्टेट बँकेच्या डॉक्टर लेन शाखेतील प्रकार
May 31, 2026
0