Type Here to Get Search Results !

मोठी जबाबदारी:छत्रपती संभाजीनगरचे न्या. रवींद्र घुगे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्तिपदी नियुक्ती

छत्रपती संभाजीनगरचे भूमिपुत्र न्यायमूर्ती रवींद्र विठ्ठलराव घुगे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्तिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयाने १ जून रोजी याबाबतची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली. मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्या. श्री चंद्रशेखर यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. त्यामुळे रिक्त पदाचा कार्यभार सांभाळण्यासाठी राष्ट्रपतींनी घटनेच्या कलम २२३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून न्या. रवींद्र घुगे यांच्या खांद्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. न्या. रवींद्र घुगे यांनी भरउन्हात केली होती पाणीपुरवठा योजनेची पाहणी मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्वोच्च स्थानी नियुक्तीने शहरवासीयांना अभिमान छत्रपती संभाजीनगर | शहरातील रस्ते, उड्डाणपूल, अतिक्रमणे आणि ऐतिहासिक वारसास्थळांच्या संवर्धनासाठी जनहित याचिकांच्या माध्यमातून ऐतिहासिक निर्णय देणारे छत्रपती संभाजीनगरचे भूमिपुत्र न्या. रवींद्र घुगे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्तिपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे कायदेक्षेत्रासह संपूर्ण शहरात अभिमानाचे वातावरण आहे. गेल्या २५ वर्षांपासून पाण्यासाठी तहानलेल्या छत्रपती संभाजीनगरकरांसाठी न्या. घुगे हे खऱ्या अर्थाने ‘जलदूत’ ठरले. शहराच्या २,७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेची त्यांनी रणरणत्या उन्हात, सुटीच्या दिवशी स्वतःच्या खर्चाने दोनदा जायकवाडी येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती. मुंबईला बदली झाल्यानंतरही, तत्कालीन मुख्य न्यायमूर्तींनी या विषयातील त्यांची पोटतिडक पाहून हा खटला न्या. घुगे यांच्याकडेच कायम ठेवला. महापालिका, जीव्हीपीआर कंपनी, मजिप्रा आणि राज्य शासन यांच्यात समन्वय साधून त्यांनी या योजनेच्या कामाला गती दिली. महापालिकेची आर्थिक स्थिती बेताची असताना त्यांनी शासनाला ‘सॉफ्ट लोन’ मंजूर करण्यास भाग पाडले. न्या. रवींद्र घुगे यांचे वडील विठ्ठलराव घुगे हे नामवंत प्राध्यापक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/olJmEHt

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.