मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ‘ऑपरेशन गोल्डन नेक्स्ट’ राबवून सोन्याच्या तस्करीचे मोठे जाळे उद्ध्वस्त केले आहे. तस्करांनी सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी प्रवाशांच्या शरीरात सोने लपवल्याचे समोर आले आहे. या कारवाईत ५.५० कोटी रुपये किमतीचे ३.४ किलो सोने जप्त केले असून विमानतळावरील ३ कर्मचाऱ्यांसह ७ जणांना अटक केली आहे.विमानतळावर उतरल्यानंतर हे सोने सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी तस्करांनी विमानतळावरील कर्मचाऱ्यांशी संगनमत केले होते. अटक केलेल्यांमध्ये ३ बांगलादेशी आहेत, तर तीन विमानतळ कर्मचारी आणि एका स्थानिक व्यक्तीचा समावेश आहे. या टोळीचा मुख्य सूत्रधार कोण, याचा शोध डीआरआयचे विशेष पथक घेत आहे. विमानतळावरील कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदणे सामान्य व्यक्तीला शक्य नसते. त्यामुळे तस्करांनी थेट विमानतळावरील कर्मचाऱ्यांनाच हाताशी धरले. प्रवाशांनी शरीरात लपवून आणलेले सोने विमानतळाबाहेर काढण्यासाठी या कर्मचाऱ्यांचा वापर केल्याचे वास्तव तपासातून समोर आले आहे. कर्मचाऱ्यांशी संगनमत विमानतळावरील कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदणे सामान्य व्यक्तीला शक्य नसते. त्यामुळे तस्करांनी थेट विमानतळावरील कर्मचाऱ्यांनाच हाताशी धरले. प्रवाशांनी शरीरात लपवून आणलेले सोने विमानतळाबाहेर काढण्यासाठी या कर्मचाऱ्यांचा वापर केल्याचे वास्तव तपासातून समोर आले आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/1B2gTFA
शरीरात लपवलेले साडेपाच कोटींचे सोने मुंबई विमानतळावर जप्त:कर्मचाऱ्यांसह 7 अटकेत, डीआरआयचीकारवाई
June 07, 2026
0