दररोज लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान आता ऊर्जेच्या बाबतीत “आत्मनिर्भर’ होण्याच्या उंबरठ्यावर आहे. संस्थानला विविध विभागांसाठी प्रतिवर्ष लागणाऱ्या एकूण ९१ लाख युनिट्स विजेपैकी तब्बल ८६ टक्के म्हणजेच ७८.८ लाख युनिट्स वीज एकट्या सौर ऊर्जेतून मिळणार आहे. सध्या पूर्ण झालेल्या दोन मुख्य रुफटॉप प्रकल्पांमधूनच संस्थानच्या वार्षिक २०.६५ कोटी रुपयांच्या वीज बिलात थेट ४.६४ कोटी रुपयांची भरघोस बचत होणार आहे. मंजुरीच्या प्रक्रियेत असलेला तिसरा प्रकल्प सुरू झाल्यानंतर ही बचत आणखी वाढेल. महावितरणवरील संस्थानची निर्भरता केवळ १४ टक्क्यांवर येणार आहे. शिर्डीत दररोज देश-विदेशातून हजारो भाविक येत असल्याने मंदिर परिसर, रुग्णालये, पाणीपुरवठा व इतर सेवांसाठी अखंड वीजपुरवठा आवश्यक असतो. वाढत्या गरजांच्या पार्श्वभूमीवर संस्थानने पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करून हरित ऊर्जेकडे वाटचाल सुरू केली आहे. यापूर्वी जानेवारी २०२४ मध्ये सुपा येथील पवनचक्की प्रकल्पातून निर्माण होणारी वीज थेट वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमातून जानेवारी २०२६ पर्यंत सुमारे ५ कोटी ६४ लाख रुपयांची बचत झाली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून उभारण्यात येणारा १.२ मेगावॅट सौर प्रकल्प मे २०२६ अखेर कार्यान्वित होईल. वार्षिक वीज बचत ७.३ मेगावॅट हरित ऊर्जा निर्मिती होणार भारत पेट्रोलियममार्फत उभारण्यात येणाऱ्या १.७ मेगावॅट प्रकल्पातून दरवर्षी सुमारे २६ लाख युनिट वीज निर्मिती होईल. यातून २ कोटी ५६ लाख रुपयांची बचत होईल. याशिवाय तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाकडून १.९ मेगावॅट क्षमतेचा भूपृष्ठ सौर प्रकल्प उभारण्याचा प्रस्तावही मंजूर आहे. सध्या संस्थानचा एकूण वीज वापर सुमारे ७.९६ मेगावॅट इतका असून सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या माध्यमातून सुमारे ७.३ मेगावॅट हरित ऊर्जा निर्मिती होणार आहे. १३ कोटींवर बचत अपेक्षित १६.३ लक्ष युनिट ऊर्जा निर्मिती संस्थानला प्रतिवर्ष होणार आहे. विद्युत वीज बिलापोटी वर्षाला साधारणत: २१ कोटी लागतात. प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर हरित ऊर्जाद्वारे संस्थानची साधारणपणे १३ ते १४ कोटी बचत अपेक्षित आहे. - किशोर गवळी, उपकार्यकारी अभियंता
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/Uaot4N9
86% विजेची गरज सौरऊर्जेतून; शिर्डी संस्थान आत्मनिर्भरतेकडे:91 लाख युनिट्सपैकी 78.8 लाख युनिट्सची निर्मिती स्वतः करणार
June 04, 2026
0