Type Here to Get Search Results !

पुण्यात घरगुत्ती गॅसचा भीषण स्फोट, नंदागौळ येथील तिघांचा मृत्यू:बालिकेसह दोघे जखमी, नंदागौळ गावावर शोककळा

पुण्यात घरगुत्ती गॅस गळतीमुळे झालेल्या भीषण स्फोटात तालुक्यातील मौजे नंदागौळ येथील रहिवासी असलेल्या व सध्या पुण्यात खांदवेनगर, खराडी येथे वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबातील तिघांचा दूर्दैवी मृत्यू झाला आहे. तर यात एका बालिकेसह दोघी जखमी आहेत. या दुर्घटनेमुळे नंदागौळ गावावर शोककळा पसरली आहे, तर गित्ते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी प्राप्त झालेली माहिती अशी की, नंदागौळ येथील रहिवासी व सध्या पुणे येथे खराडी परिसरात वास्तव्यास असलेले विष्णू मुंजाजी गित्ते यांच्या पुण्यातील घरी आज दिनांक 5 जून रोजी सकाळी 9.30 वाजण्याचे सुमारास घरातील स्वयंपाकांच्या गॅसची अचानक गळती होऊन मोठा स्फोट झाला. स्फोटात पांडुरंग विष्णू गित्ते (वय 35 वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. तर विष्णू मुंजाजी गित्ते (वय - 62 वर्ष), त्यांची पत्नी सौ. वृंदावणी विष्णु गित्ते (वय 58 वर्षे) यांना गंभीर जखमी अवस्थेत पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांच्या मृत्यू झाला. या स्फोटात कु. नहारिका गित्ते (वय 5 वर्षे), सौ. राजश्री पांडुरंग गित्ते (वय 25 वर्षे) जखमी झाल्या असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. नंदागौळ गावावर शोककळा पुण्यात घरगुती गॅसचा स्फोट होऊन नंदागौळ येथील एकाच कुटुंबाती विष्णू मुंजाजी गित्ते, सौ. वृंदावणी विष्णु गित्ते, पांडुरंग विष्णु गित्ते या तिघांचे निधन झाल्याची घटना समजतात नंदागौळ गावावर शोककळा पसरली. गित्ते कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. दिवसभर गावामध्ये या एकाच घटनेची चर्चा ऐकावयास मिळत होती. नंदागौळ येथे अंत्यसंस्कार घरगुती गॅसच्या स्फोटामध्ये पुणे येथे निधन झालेल्या नंदागौळ येथील एकाच कुटुंबातील तिघांच्या पार्थिवावर उद्या शनिवार दिनांक 6 जून रोजी सकाळी नंदागौळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून देण्यात आली.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/Gcv65yN

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.