Type Here to Get Search Results !

जयकुमार गोरे निश्चितपणे कॉप्या करून पास झालेले मंत्री:पत्रकार परिषद घेताना थोडी कमी पीत चला; सुषमा अंधारेंचा जयकुमार गोरेंवर जोरदार पलटवार

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि भाजप नेते जयकुमार गोरे यांच्यातील शाब्दिक युद्ध आता शिगेला पोहोचले आहे. जयकुमार गोरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावरून अत्यंत आक्रमक आणि जळजळीत भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. "जयकुमार गोरे हे निश्चितपणे कॉप्या करून पास झालेले मंत्री असावेत," असा टोला लगावत अंधारे यांनी गोरेंच्या संस्कारांवर आणि भाषेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "पत्रकार परिषद घेताना कमी पीत चला" सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये जयकुमार गोरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. "जयकुमार, पत्रकार परिषद घेत असताना थोडी कमी पीत चला... आणि हो एखाद्याच्या पत्रकार परिषदेचे उत्तर द्यायचे असेल, तर आधी त्याने घेतलेली पत्रकार परिषद पूर्ण बघत चला," असा सल्ला अंधारे यांनी दिला आहे. 'लिंगपिसाट' शब्दावरून स्पष्टीकरण अन् टोला जयकुमार गोरे यांनी ज्या 'लिंगपिसाट' शब्दावरून आक्षेप घेतला होता, त्याबाबतही सुषमा अंधारे यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. "तुमच्यासाठी लिंगपिसाट शब्द संपूर्ण पत्रकार परिषदेत कुठेही वापरलेला नाही. पण तुम्हाला स्वतःला जर त्याबद्दल इतकी खात्री वाटत असेल, तर त्याला माझा नाईलाज आहे," असा चिमटा अंधारे यांनी काढला आहे. तसेच, गोरे यांच्या आजूबाजूला बसलेल्या 'दोन चमचे वजा दलालांनी' त्यांना चुकीचे ब्रीफिंग केल्याचा दावाही अंधारे यांनी केला आहे. "भाजप नेत्याकडून दुसरी अपेक्षा नाहीच" जयकुमार गोरे यांच्या भाषेचा समाचार घेताना अंधारे म्हणाल्या की, "तुमच्या बोलण्याचं मला फार विशेष असं वाटलं नाही. भाजपचा नेता म्हटल्यावर ही भाषा फारच सहज आणि स्वाभाविक आहे. कारण तुमच्यासारख्या माणसाकडून दुसरी काहीच अपेक्षा असू शकत नाही." यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपच्या कार्यपद्धतीवरही निशाणा साधला आहे. "तुमच्या बहिणीशी याच भाषेत बोलता का?" शेवटी, सुषमा अंधारे यांनी महिलांच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित करत गोरेंना थेट आणि भावनिक सवाल विचारला आहे. "काल तुम्ही माझा उल्लेख 'ज्येष्ठ भगिनी' असा केलात आणि आज तुमच्या तोंडी असे शब्द आहेत. जयकुमार, तुमच्याकडे मोठ्या किंवा छोट्या बहिणीशी याच भाषेत बोलतात का?" असा सवाल उपस्थित करत अंधारे यांनी जयकुमार गोरे यांच्या भूमिकेवर बोट ठेवले आहे. हेही वाचा.. मी कोणत्याही प्रस्थापिताच्या सुपारीवर राजकारण करत नाही!:सुषमा अंधारे यांच्या आरोपांवर मंत्री जयकुमार गोरे यांचा पलटवार शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे आमदार तथा मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि कोविड काळात पैसे लाटल्याचे गंभीर आरोप केले होते. या आरोपांना आता जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तर दिले आहे. "मी एका सामान्य शेतकऱ्याचा आणि रेशन दुकानदाराचा मुलगा असून, कोणत्याही प्रस्थापितांच्या मेहरबानीवर किंवा कुणाच्या सुपारीवर मी राजकारण करत नाही. मी प्रस्थापितांच्या विरोधात लढून इथपर्यंत आलो आहे," असा जोरदार पलटवार आमदार गोरे यांनी केला आहे.सविस्तर वाचा

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/MwUPuEc

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.