कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांना प्रतीक्षा कक्षासाठी ४५० चौरस फूट जागा हवी होती. त्यांना ३०० चौ. फूट जागा कार्यालयासाठी तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यांना यापूर्वीच मंत्रालयाची मुख्य इमारत, दुसरा मजला, दालन क्र. २०२ वाटप करण्यात आले आहे. लोढांना कार्यालयासाठी दिलेल्या जागेत कामकाज करण्यास अडचण निर्माण होत होती. त्यामुळे त्यांना ३०० चौ. फूट अधिक जागा देण्यात आली आहे, असा दावा सामान्य प्रशासन विभागाकडून केला जात आहे. मुंबईतील आणखी एक मंत्री आशिष शेलार यांना यापूर्वी मंत्रालयासमोरील बी-२ (रत्नसिंधू) हा बंगला देण्यात आला होता. त्यांना आता मुंबई महापालिकेच्या ताब्यातील “हायड्रॉलिक” या बंगल्याचे वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. तसेच “मित्रा” संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांना “ब-२ रत्नसिंधू” या बंगल्याचे वाटप करण्यात आले आहे. एकुणात महायुती सरकारमध्ये मंत्रालयातील दालन, वेटिंग रूमसाठी ओढाताण सुरू असल्याचे दिसत आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/85xOuiD
मंत्री लोढांना मिळाली 450 ऐवजी फक्त 300 फूट जागा:मंत्रालयात दालन, वेटिंग रूमसाठी ओढाताण सुरू
January 09, 2025
0