धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनीमला धमकावून आमची परळीतील बाजारभावानुसार सुमारे साडेतीनकोटी रुपयांची जमीन फक्त २१ लाख रुपयांत हडपली. वाल्मीक कराडच्या माणसांनी आम्हाला धमकावले होते,असा आरोप धनंजय आणि पंकजा यांच्या सख्ख्या मामी आणि प्रवीण महाजन(दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजनयांचे बंधू) यांच्या पत्नी सारंगी महाजनयांनी केला . उपमुख्यमंत्री अजितपवार, शरद पवारांची भेट घेऊन हाविषय त्यांच्या कानावर घातला आहे.मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार आहे.अजित पवारांनी प्रकरण मार्गीलावण्याची खात्री दिली आहे, असेत्यांनी सांगितले. सारंगी म्हणाल्या की, वाल्मीककराड आणि त्याच्या माणसांनी हीजमीन बळकावली. धनंजय यांचानोकर गोविंद मुंडे याने धाक दाखवूनजमिनीची रजिस्ट्री केली. मला परळीतबोलावून कोऱ्या कागदावर सह्याघेतल्या. ती जमीन गोविंद मुंडे, त्याचीसून, दशरथ साठे यांच्या नावे केली. आरोप बिनबुडाचे, व्यवहारत्यांच्या संमतीने- गोविंद मुंडे महाजन यांच्या जमीन खरेदीचाव्यवहार त्यांच्या संमतीने झाला होता.व्यवहारात ठरलेली पूर्ण रक्कम त्यांनादिली आहे. महाजन या सुशिक्षितआहेत, त्या कोऱ्या कागदावर सहीकशी करू शकतात. त्यांनी केलेलेआरोप बिनबुडाचे आहेत. व्यवहाराचीपूर्ण कागदपत्रे माझ्याकडे आहेत. याव्यवहारात मंत्री धनंजय मुंडे व पंकजामुंडे यांचा संबंध नाही, असे जमिनीचेखरेदीदार गोविंद मुंडे यांनी सांगितले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/C5aX17s
धनंजय, पंकजा मुंडे यांनीजमीन हडपली- महाजन:साडेतीन कोटींची जमीन 21 लाखांत घेतल्याचा आरोप
January 08, 2025
0