विठ्ठल रुक्मिणी मंदिरास सुमीत मोरगे या भाविकाने ६ लाख रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने अर्पण केल्याची माहिती मंदीर समितीने दिली. यामध्ये गोफासह लिंग, बेलपान, मंगळसूत्र, बाजूबंद इत्यादी ८१ ग्रॅम वजनाचे सोने तसेच ७५ ग्रॅम वजनाचे चांदीचे करंडे, वेढणे जोड वस्तू दान केली. जालना येथील आर्या आदित्य अग्रवाल यांनी ७१ हजाराची देणगी दिली. दर्शनासाठी ६ तासांचा वेळ पौष शुद्ध पुत्रदा एकादशीनिमित्त पंढरपुरात लाखांवर भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. सकाळपासून विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा नदी प्रदक्षिणामार्ग, महाद्वार, पश्चिम द्वारसह दर्शनरांग भाविकांच्या गर्दीने गजबजून गेली आहे. विठ्ठल दर्शनासाठी किमान सहा ते सात तासांचा कालावधी लागतो आहे. मुखदर्शनासाठी एक ते दीड तासाचा कालावधी लागत आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/IirT3Fo
पुत्रदा एकादशीस पंढरीत लाखावर भाविकांची गर्दी:विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी 6 लाखांचे दागिने अर्पण
January 10, 2025
0