Type Here to Get Search Results !

मांजर लपवल्याने 5 वर्षांच्या मुलीला चटके:मुंबईतील गोवंडी परिसरातील घटना, 38 वर्षीय महिलेला केली अटक

घरात पाळलेली मांजर लपवली म्हणून ३८ वर्षांच्या महिलेने पाच वर्षांच्या मुलीला जबर मारहाण करून लोखंडी रॉडने चटके दिल्याची घटना समोर आली. या प्रकरणी मुलीने तिच्या घरी सांगितल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोवंडी या ठिकाणी गुरुवारी ही घटना घडली. मुंबईतल्या गोवंडीमध्ये असलेल्या शिवाजीनगर भागात राहणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. पाच वर्षांच्या मुलीचे पालक मागच्या तीन महिन्यांपासून गोवंडी या ठिकाणी राहतात. त्यांच्या शेजारी ३८ वर्षांची एक महिला राहते. तिची मांजर लपवल्याने त्या महिलेने या पाच वर्षांच्या मुलीला मारहाण केली आणि तिला लोखंडी रॉडने चटके दिले. या महिलेचे नाव निशाद शेख असे आहे. तिची मांजर हरवल्याने ती अस्वस्थ झाली. त्यानंतर तिने या कारणावरून पाच वर्षांच्या मुलीला मारहाण केली आणि तिला चटकेही दिले अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर मुलीला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती आता ठीक असून तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/fbXgx9u

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.