Type Here to Get Search Results !

5 नगरसेवक उद्धवसेनेशी एकनिष्ठ, दोघांना संभ्रम, एकीची ‘नो कॉमेंट’:रूपचंद वाघमारे, ज्योती वाघमारे शिंदेसेनेत करणार प्रवेश

उद्धवसेनेचे नगरसेवक शिंदेसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांना थांबवण्याचे प्रयत्न उद्धवसेनेने सुरू केले आहेत. ‘दिव्य मराठी’ने या सर्व नगरसेवकांशी संपर्क साधून त्यांची भूमिका विचारली. मकरंद कुलकर्णी, अनिल जैस्वाल, मोहन मेघावाले, ज्योती पिंजरकर, सीमा चक्रनारायण यांनी पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर रूपचंद वाघमारे व ज्योती वाघमारे यांनी शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, स्वाती नागरे व किशोर नागरे यांनी प्रवेशाबाबत स्पष्ट काही सांगितले नाही. दरम्यान, नगरसेवकांची माझ्या घरी बैठक झाली आहे. माझी तब्येत बरी नसल्याने उशीर झाला. नऊ नगरसेवक शिवसेनेत येणार आहेत, असे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी स्पष्ट केले.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/T59O4Uc

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.