Type Here to Get Search Results !

बहिणीची हत्या करूनही पश्चात्ताप नाही:ऑनर किलिंगप्रकरणी आरोपी चुलत भावाला दोन दिवसांची पोलिस कोठडी

दुसऱ्या जातीतील मुलासोबत प्रेमसंबंध असल्याने चुलत बहिणीला डोंगरावरून ढकलून देणाऱ्या आरोपी ऋषिकेश तानाजीराव शेरकर (२५, रा. वळदगाव) याला केलेल्या कृत्याचा कसलाही पश्चात्ताप झालेला नाही. मंगळवारी न्यायालयात हजर केले त्या वेळी तो हसतमुखाने वावरत होता. “चुकीचे पाऊल उचलल्याने तिला ढकलून दिले,” असे त्याने पोलिसांकडे कबूल केले आहे. त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. न्यायालयाच्या परिसरात त्याचे काही मित्र आले होते. त्यांना बघून त्याने हात दाखवत ‘हाय’ देखील केले. त्याला या कृत्याचा काहीही पश्चात्ताप नसल्याचे दिसून आले. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी : विजया रहाटकर या घटनेची दखल राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनीही घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा करण्याची मागणी त्यांनी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्याकडे केली. समाजात अशा प्रकारच्या घटना वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/LnTBzw1

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.