Type Here to Get Search Results !

डोक्याचे केस पकडत लिंबाच्या काठीने विद्यार्थ्याला अमानुष मारहाण:वरच्या वर्गात का बसला म्हणत शिक्षकाने मांडीवर वळ उमटेपर्यंत मारले, गुन्हा दाखल

जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका विद्यार्थ्याला मुख्याध्यापकाने अमानुष मारहाण केली असल्याची घटना जालना येथे घडली आहे. सातवीचा एक विद्यार्थी नववीच्या वर्गात बसला म्हणून मुख्याध्यापकाने लिंबाच्या काठीने मारले आहे. विद्यार्थ्याच्या मांडीवर आणि पायावर काठीचे वळ उमटले असून प्रकृती देखील बिघडली आहे. या प्रकरणातील मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची मागणी संतप्त पालकांनी केली आहे. या प्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना येथील अंबड तालुक्यातील शहागड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ही घटना घडली आहे. शिक्षकाने विद्यार्थ्याला अत्यंत अमानुषपणे मारहाण केली असल्याने एकच खळबळ उडाली आहे. नववीच्या वर्गात का बसला, असे विचारात विद्यार्थ्याला मारले आहे. विद्यार्थ्याच्या मांडीवर व पायावर काठीचे वळ उमटले असून त्याची तब्येत देखील खराब झाली आहे. हा विद्यार्थी 14 वर्षांचा आहे. या अल्पवयीन विद्यार्थ्याच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मुख्याध्यापक खेडकर यांच्याविरोधात गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या 14 वर्षीय विद्ययार्थयाचे नाव फैयाज आयुब शेख असे असून इयत्ता सातवीमध्ये तो शिकत आहे. त्याचे वय जास्त असल्याने त्याला सातवीचे वर्ग शिक्षक नरसाडे सर यांनी इयत्ता नववीमध्ये बसायला सांगितले होते. त्यांच्या सूचनेवरून हा 23 डिसेंबरपासून नववीच्या वर्गात जाऊन बसायला लागला. मात्र, 6 जानेवारी रोजी शाळेतील नववीच्या वर्गात आपण बसलो असताना पाचवा तास शिकवायला मुख्याध्यापक खेडकर सर आले. ते दररोज मराठी विषय शिकवतात. त्यांनी शिकवलेल्या धड्याची प्रश्नोत्तर लिहून आणली का, असे वर्गात विचारल्यावर आपण उत्तर लिहिले नसल्याचे त्यांना सांगितले, असे विद्यार्थ्याने सांगितले. आपण प्रश्नोत्तर लिहिली नाहीत हे खेडकर सरांना समजल्यावर त्यांनी जवळ बोलावून का लिहिली नाहीत असे विचारले. तेव्हा मी त्यांना म्हणालो, मला वर्गात येऊन सात-आठ दिवस झालेले असून मी वर्गात नवीन आहे. असे म्हटल्यावर त्यांनी तू नववीच्या वर्गात कसा काय आलास आणि कसा बसलास असे म्हणत त्यांनी आपल्या डोक्याचे केस पकडून लिबांच्या काडीने दोन्ही पायाच्या मांडीवर पाठीमागे आणि माझ्या गालावर मारले आणि हातावर सुज येईपर्यंत मारहाण केली, असे विद्यार्थ्याने सांगितले आहे. या प्रकरणात विद्यार्थाचे पालक शेख यांनी गोंदी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/NB76vXk

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.