Type Here to Get Search Results !

छत्रपती संभाजीनगरात नऊ महिन्यांत 615 कोटी गुंतवणूक:राज्यात 1 लाख 13 हजार कोटींची परदेशी गुंतवणूक

थेट विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. विशेष म्हणजे गेल्या ४ वर्षांमध्ये राज्यात सरासरी १ लाख १९ हजार ५५६ कोटी रुपये वार्षिक गुंतवणूक राज्यात आली आहे. मात्र यंदा २०२४-२५ या आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यांतच म्हणजे सप्टेंबरपर्यंत यापैकी १ लाख १३ हजार २३५ कोटी ५३ लाख रुपये (सरासरीच्या ९५ %) इतकी गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. पुढच्या सहा महिन्यांत हाच वेग कायम राहिला तर एप्रिल २०२५ पर्यंत दुप्पट गुंतवणुकीचा विक्रम महाराष्ट्र गाठू शकतो. चालू आर्थिक वर्ष एप्रिल ते सप्टेंबर २०२४ दरम्यान देशात एकूण २,४९,०३२.११ कोटींची परदेशी गुंतवणूक आली. त्यापैकी ४५.४९ टक्के वाटा हा एकट्या महाराष्ट्राचा आहे, हे विशेष. जानेवारी ते सप्टेंबर २०२४ दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये एफडीआयअंतर्गत एकूण ६१५.१५ कोटींची गुंतवणूक आली. याच कालावधीत अहिल्यानगरमध्ये १३.३३ कोटी, अमरावतीत ३५ लाख, जळगावमध्ये ९.९० कोटी, नाशिकमध्ये ९.९६ कोटी, सोलापूरमध्ये ४.२५ कोटी गुंतवणूक झाली. ‘डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड’च्या अहवालात ही माहिती दिली आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाहीच : मुख्यमंत्री गेल्या दोन-अडीच वर्षंापासून महाराष्ट्राची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही. माझे सहकारी एकनाथ शिंदे, अजित पवार व संपूर्ण मंत्रिमंडळाच्या नेतृत्वात आपल्या राज्याची घोडदौड अशीच कायम राहील. - देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांपेक्षा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे जिल्हे वरचढ मुख्यमंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान २३१.८ कोटी आले. परंतु याच काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात ९,९४७.७० कोटी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात ४,११६.०३ कोटींची परदेशी गुंतवणूक झाली.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/y8A9ezg

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.