"सत्तार, झूठ बोलने से पहले अल्लाह से डरो'' असेसांगत "अब्दुल सत्तार यांनीच मला पाडण्यासाठीविरोधकांना मदत केली होती.माझ्यासह तीन जणांनापाडण्याचा प्रयत्न केला'' असाआरोप सामाजिक न्यायमंत्री आ.संजय शिरसाट यांनी सिल्लोडचेआमदार अब्दुल सत्तार यांच्यावर केला. सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक मैदानावर सभा घेतली होती. त्या वेळी त्यांनी संजय शिरसाट यांचे नाव न घेतात्यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या टीकाकेली. त्याला मंत्री शिरसाट यांनी दिव्य मराठीशीबोलताना प्रत्युत्तर दिले आहे. "तुम्ही सिल्लोडला काय येता, मीच संभाजीनगरमध्ये आलो आहे'' असे सांगत त्यांनी सभेत टीका केली होती. जिल्ह्याच्या नेतृत्वाचा निर्णय शिंदेच घेतील सत्तार यांनी संघटनेत काम केलेलेनाही. त्यामुळेजिल्हाप्रमुख-पालकमंत्री -पक्षाचेप्रमुख अशी रचना ठरलेली असते.त्यामुळे पालकमंत्रीच निवडणुकांचेनेतृत्व करतील, असे जिल्हाप्रमुखराजेंद्र जंजाळ यांनी सांगितले. तर,खासदार संदिपान भुमरे म्हणालेकी, निवडणुकांबाबत एकनाथशिंदेच निर्णय घेतील. प्रदीपजैस्वाल म्हणाले की, या शहरात निवडणुकांत छत्रपती संभाजीनगरात बाळासाहेब ठाकरेंनी नेतृत्व केले होते. आता एकनाथ शिंदेंचे नेतृत्व राहणार आहे. अब्दुल सत्तार : मी पालकमंत्रीअसताना जिल्ह्यात सर्व विधानसभांतयश मिळवले. मी छत्रपती संभाजीनगरात येऊन तुमची दहशत संपवणार. संजय शिरसाट : माझ्यावर आता ते टीका करत आहेत. मात्र मला पाडण्यासाठी सत्तार यांनी प्रयत्न केले. त्यासाठी विरोधकांना मदत केली.माझ्यासह वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे, कन्नडच्या आमदार संजना दानवे यांना पाडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, याची माहिती सर्वांना आहे. अब्दुल सत्तार : तुम्ही सिल्लोडला काय येता, मी येथेच येऊन थांबणार आहे. शिरसाट : ते कोणत्या पक्षाकडून नेतृत्व करणार आहेत मला माहीत नाही. आमच्या पक्षात एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व आहे. त्यामुळे निवडणुकांसंदर्भातील निर्णय ते घेतील.सत्तारांचे नेतृत्व आम्हाला मान्य नाही. एकनाथ शिंदे सांगतील त्यानुसार निवडणुकीत सर्व केले जाईल. अब्दुल सत्तार : एकालासिल्लोडची खूप आठवण येत आहे.नाला खळखळ करत आहे. आम्हीसमुद्र आहोत हे त्यांना माहीत नाही. शिरसाट : त्यांच्या टीकेवर उत्तरदेण्यात मला वेळ वाया घालवायचानाही. मी माझ्या कामांनी दाखवून देणारआहे. अब्दुल सत्तार: अडीच वर्षांनंतर मी पुन्हा येईन शिरसाट: अडीच वर्षांत मी माझ्याकामाने उत्तर देणार आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/gXhlLy1
झूठ बोलने से पहले अल्लाह से डरो;शिरसाटांचे सत्तारांना उपदेशाचे डोस:छत्रपती संभाजीनगरचे नेतृत्व करण्यासाठी आमदारांमध्ये रस्सीखेच
January 03, 2025
0