नवीन शैक्षणिक धोरणानुसार बी.एड.च्या अभ्यासक्रमांतही राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेने (एनसीटीई ) पुढील शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून इंटिग्रेटेड बी.एड. कोर्स बंद करण्याच्या निर्णयानंतर लगेच बारावीनंतर चार वर्षांचा नवीन एकीकृत शिक्षक शिक्षा कार्यक्रम ( इंटिग्रेटेड टीचर्स एज्युकेशन प्रोग्राम,आयटीईपी) नोंदणीसाठी राज्यातील १६ महाविद्यालयांनी केलेले अर्ज नामंजूर केले आहेत. त्यात मराठवाड्यातील बीड आणि परभणी येथील प्रत्येकी एका महाविद्यालयांचा समावेश आहे. त्यामुळे आता पुढील वर्षीपासून इंटिग्रेटेड बी.एड. अभ्यासक्रमांच्या जागी आयटीईपी अभ्यासक्रम सुरू होण्याबाबत साशंकता वाढली आहे. एनसीटीइने चार वर्षीय बी.एड. इंटिग्रेटेड (बी.ए., बी.एड. व बी.एस्सी. बी.एड.) अभ्यासक्रमाच्या २०१४ च्या नियमात काही सुधारणा करून नवीन नियम २०२४ पासून लागू करण्याबाबत सूचनाही जानेवारीतच जाहीर केली होती. त्यानुसार सध्याचे बी.एड. इंटिग्रेटेड कोर्स २०२५-२६ पासून बंद करून आयटीइपी लागू करण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी या महाविद्यालयांकडून आयटीइपीने परवानगीसाठी अर्ज मागवले होते. त्यानुसार देशभरातून अर्जही करण्यात आले. नॅकची ए-प्लस मानांकन हवे, ३० वर्षांपेक्षा कमी अनुभव नको, २ एफ, १२ बी (यूजीसी मान्यता हवी), एनआयआरएफ रँकिंग, स्टाफ, इन्फ्रास्ट्रक्चर, लॅबरोटरीज, लायब्ररी यांसह २० बाबींचे मानदंड होते. पैकी १० निकषांची पूर्तता हवी. ते या महाविद्यालयांकडे नव्हते. हा अभ्यासक्रम बंद होणार नाही. तो पदवीनंतर दोन वर्षांचा राज्यात जुना बी.एड. अभ्यासक्रम बंद होणार का? मग त्या अभ्यासक्रमाला कधीपर्यंत प्रवेश घेता येईल? - बंद होणार नाही. तो पदवीनंतर दोन वर्षांचा आहे. नियमित सीईटी सेलद्वारे प्रवेश दिले जातील. ती प्रक्रिया सध्या पूर्ण. जुने बीएड केल्यानंतर दुसरा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल का? तो किती वर्षांचा असेल? - जुने बी.एड. हे पदवीनंतर २ वर्षाचे असते. नवीन कुठलाही कोर्स करण्याची गरज नाही. नवीन बी.एड. हा इंटिग्रेटेड टीचर्स एज्युकेशन प्रोग्राम (आयटीईपी)हा बारावीनंतर चार वर्षांचा अभ्यासक्रम आहे. नवीन अभ्यासक्रमाचे राज्यात किती मान्यताप्राप्त कॉलेज आहेत? कुठे? जागा किती? त्यांची माहिती? - नवीन अभ्यासक्रम मान्यतेच्या कॉलेजांची माहिती जाहीर झाली नाही. ती आॅनलाइन एनसीटीइच्या संकेतस्थळावर मिळेल. बी.एड. साठी नव्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा की जुन्या? - नवीन शैक्षणिक धोरण २०२० मध्ये हे बदल केलेत. त्यामुळे ४ वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असेल. सांगणे कठीण आहे. नवीन अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असल्यास प्रक्रिया काय? - ही प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (एनटीए) वतीने केली जाईल. त्यानुसार प्रवेश घेता येतील. जुन्या अभ्यासक्रमाच्या जागा? - ४५० महाविद्यालयांत ३४,००० जागा आहेत. अर्ज नामंजूर झालेले महाविद्यालये १) जे.ए.टी. आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स महिला कॉलेज, मालेगाव, (आयटीइपी) २) पोद्दार बी.एड. कॉलेज मालेगाव, पाटणे, टेहरेगाव, मालेगाव, नाशिक (आयटीइपी) ३) भारतीय शिक्षक महाविद्यालय गोपाल एज्युकेशन सोसायटी, भामटी पन्नसेनानगर, नागपूर (बीएड) ४) ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ, श्रीपतराव चाैघुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज मालवाडी - कोटोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर (आयटीइपी) ५) शेतकरी शिक्षक प्रसारक मंडळाचे कॉलेज आॅफ फिजिकल एज्युकेशन आष्टी, जि. बीड ६) सेंट मारियाज् कॉलेज आॅफ एज्युकेशन काैसा मुंब्रा, फकिरशाह बाबा हिल रोड, ठाणे, ७) लेट. खतीजा कॉलेज आॅफ एज्युकेशन बीएड, काैसा मुंब्रा, ठाणे. (आयटीइपी) ८) सीएमआय सर्व्हिस, सोसायटी, संत कुरियाकोज इलियस छावरा बी.एड. कॉलेज, बामणी, चंद्रपूर (आयटीइपी-बी.एड.) ९) चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर क्लाराज कॉलेज आॅफ एज्युकेशन वर्सोवा, यारीरोड, आंबोली, मुुंबई उपनगर (आयटीइपी) १०) प्रा. डाॅ. सुधाकरराव जाधवर कॉलेज आॅफ एज्युकेशन नऱ्हेे, हवेली, पुणे ११) डाॅ. विठ्ठलराव खोब्रागडे बी.एड. कॉलेज चंपा, मजारी, उमरेेड, नागपूर (आयटीइपी) १२) ज्ञानोपासक शिक्षण मंडळ परभणी, जिंतूर रोड, परभणी (आयटीइपी) १३) लेट. खतिजा कॉलेज आॅफ एज्युकेशन, देवघर, वाडा, पालघर (आयटीइपी) १४) ग्यानोदया बी.एड. कॉलेज, ठाणे १५) शान एज्युकेशन सोसायटीज् ग्रॅज्युएशन कॉलेज आॅफ एज्युकेशन, कोंढवा, हवेली, पुणे (आयटीइपी) १६) श्री खंडेराया प्रतिष्ठान, बालेवाडी, पुणे
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/8vVgyxr
एनसीटीईचे 20 पैकी 10 निकष अपूर्ण:मराठवाड्यातील 2, राज्यातील 16 बी.एड. कॉलेजमधील बारावीनंतरचे चार वर्षांचा आयटीईपी अभ्यासक्रम नामंजूर
January 03, 2025
0