मुंबईमध्ये मराठी भाषेला तसेच मराठी भाषकांना सातत्याने विरोध होत असल्याच्या घटना घडताना दिसत आहेत. ठाणे जिल्ह्याच्या मुंब्रा येथे एका मराठी तरुणाला जमलेल्या जमावाने दमदाटी करत माफी मागायला लावली असल्याची घटना समोर आली आहे. या तरुणाने केवळ फळविक्रेत्याला मराठीमध्ये बोलण्यास सांगितले असल्याचे त्याने व्हिडिओमध्ये सांगितले आहे. मुंब्रा येथे फळविक्रेत्याला मराठी का येत नाही विचारले म्हणून जमावाने एका मराठी तरुणाला माफी मागायला लावली आहे. विशेष बाब म्हणजे मुंब्रा पोलिसांनी या तरुणावरच गुन्हा दाखल केला आहे. या मराठी तरुणाला जमलेल्या जमावाने शिवीगाळ केली असल्याचे एका व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. फळविक्रेता आणि या तरूणात मराठी भाषेवरून वाद झाला होता. या तरुणाने फळविक्रेत्याला मराठीत बोलण्यास सांगितले, मात्र त्याने मला मराठी येत नाही मी हिंदीतच बोलणार असे म्हंटले. यावर तरुणाने महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी आलेच पाहिजे. मी मुंब्रा बंद करून टाकेल, असे हा तरुण त्याला म्हणाला. मात्र, मराठी तरुणाच्या या वाक्यावरून फळविक्रेत्याने वाद घालण्यास सुरू केले आणि नंतर हा वाद चिघळला. तेव्हा इतर फळविक्रेत्यांनी तसेच स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मराठी युवकाला घेरले. आम्हाला मराठी येत नाही, काय करायचे ते कर असे जमलेल्या लोकांनी या तरुणाला बोलण्यास सुरुवात केली. ही संपूर्ण घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हिंदी येते तर हिंदी बोल, वाद कशाला घालतो असे बोलून मराठी तरुणाला सर्वांनी मिळून पोलिस ठाण्यात नेले. सोशल मीडियावर या संदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मुंब्र्यात मराठी-हिंदी वाद का करतो, मुंब्रा शांत आहे, शांत राहू दे असे स्थानिक बोलू लागले. त्यानंतर, गर्दी वाढल्याने वाद चिघळला आणि लोकांनी त्या मराठी तरुणाला मुंब्रा पोलिस स्टेशन येथे नेऊन त्याच्यावरच गुन्हा दाखल केला.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/tAuf94S
मुंबईत पुन्हा मराठी हिंदी वाद:मराठीत बोलायला सांगणाऱ्या तरुणालाच माफी मागायला लावली, त्याच्यावर गुन्हाही दाखल
January 02, 2025
0