यावल येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत उल्हास नवभारत साक्षरता मेळावा झाला. त्यात संपूर्ण तालुक्यातील शाळांनी सहभाग घेतला होता. त्यात दहिगाव केंद्राने "साक्षरतेकडून समृद्धीकडे’ या विषयावर सादर केलेल्या प्रकल्पाचा तालुक्यात पहिला क्रमांक आला. यावल येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत उल्हास नवभारत साक्षरता मेळावा तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, गटविकास अधिकारी मंजूषा गायकवाड, गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांच्या उपस्थितीत आयोजित केला होता. त्यात तालुक्यातील सर्व जि.प. प्राथमिक शाळा व माध्यमिक केंद्रातून विविध शाळांनी सहभाग घेतला. प्रत्येक केंद्राला साक्षरतेवरील विविध विषय दिले होते. दहिगाव केंद्राला "साक्षरतेकडून समृद्धीकडे’ हा विषय दिला होता. त्यासाठी दहिगाव येथील आदर्श विद्यालयातील कलाशिक्षक अजय पाटील आणि आर.आर.चौधरी यांनी विषयानुरूप मॉडेल तयार केले. अक्षर ओळखीतून सर्व क्षेत्रात प्रगती कशी साधली जाईल, वाचनातून साहित्य, विज्ञान, कृषी व वाणिज्य अशा विविध क्षेत्रात प्रगतीला कशी चालना मिळेल? आपापल्या कार्यक्षेत्रात प्रत्येक नागरिकाला प्रगतीसाठी कशी संधी राहील? याचा संदेश दिला. दरम्यान, मेळाव्यातील तीन विजेते निवडण्यात आले. त्यात आदर्श विद्यालय दहिगाव, जि.प.उर्दू प्राथमिक व जि.प. प्राथमिक शाळा सावखेडासीम या दहिगाव केंद्राचा पहिला क्रमांक आला. संस्थेचे चेअरमन सुरेश पाटील, केंद्रप्रमुख विजय ठाकूर यांनी सर्व विजेत्यांचे कौतुक केले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/1LkEoDC
साक्षरतेकडून समृद्धीकडे प्रकल्प तालुक्यात प्रथम:दहिगावच्या आदर्श विद्यालयाने केले सादरीकरण
January 02, 2025
0