ज्येष्ठ साहित्यिक आणि दूरदर्शनचे प्रसिद्ध माजी वृत्तनिवेदक प्रा. अनंत भावे यांचं रविवारी निधन झालं. पुण्यातील अथश्री या वृद्धाश्रमात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी बाल साहित्यात त्यांचं मोठं योगदान होते. प्रा. अनंत भावे हे एक मराठी साहित्यिक, पत्रकार आणि वक्ते होते. श्री.ग. माजगावकर यांच्या माणूस साप्ताहिकात ते स्तंभलेखन करायचे. हे साप्ताहिक १९८६मध्ये बंद झालं. मुंबईत १९८३ साली भरलेल्या विनोदी साहित्य संमेलनात भावे यांच्या अध्यक्षतेखाली वृत्तपत्रीय ललित स्तंभलेखनातील विनोदाचे स्वरूप आणि परिणाम हा परिसंवाद झाला होता. तसंच भावे यांचे बरेच बालवाङ्मय प्रसिद्ध आहेत. साहित्य अकादमीने सन्मानित साहित्य अकादमीचा २०१४ सालचा बालसाहित्याचा पुरस्कार. ताम्रपट व पन्नास हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पत्रकार, लेखक म्हणून ते अतिशय सजग होते. कुणावरही टीका करताना ते भीड बाळगत नसत. मात्र त्यांची लिखाणाची शैली 'निर्विश' होती. साधा झब्बा, पायजमा, खांद्यावर शबनम झोळी अशा अवतारातले अनंत भावे कोणत्याही साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमात दिसले तर पाहणाऱ्यांच्या नजरा आपोआप त्याच्याकडे वळत असत. आई-बाबा 70 आणि 80 च्या दशकातल्या अनंत भावे यांच्या ग्लॅमरबद्दल आपल्या मुलांना सांगत असत. अनंत भालेराव यांची पुस्तके
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/jsdyNxk