शहर पाणी योजनेची २,५०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी पैठण-छत्रपती संभाजीनगर रस्त्याखाली येत आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या अवजड वाहनांच्या दाबामुळे जलवाहिनी फुटण्याचा धोका आहे. त्यामुळे आता रस्ता दुसऱ्या बाजूने भूसंपादन करून रुंद करण्यात येणार आहे. त्यासाठी जलवाहिनी असलेल्या भागावर तब्बल ३४ किलोमीटर लांब बॅरिकेडिंग करण्यात येईल आणि दुसऱ्या बाजूकडील भूसंपादन करून रस्ता रुंद केला जाईल. त्यासाठी सुमारे दीड वर्षाचा कालावधी लागू शकतो. दरम्यानच्या काळात एका बाजूने दुपदरी, तर दुसऱ्या बाजूने एकपदरी रस्ता सुरू राहील. त्यामुळे रस्त्यावरून रोज ये-जा करणाऱ्या सुमारे ४० हजार वाहनधारकांना दीड वर्षासाठी वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे. संभाजीनगर-पैठण रस्त्यावर तब्बल ३४ किलोमीटर अंतराच्या रस्त्याखाली जलवाहिनी आहे. अवजड वाहनांच्या भाराने भविष्यात पाणी योजनेला धोका निर्माण होऊ शकतो. यासंदर्भात मुख्यमंत्री फडणीस यांच्या सूचनेनुसार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) यांनी रस्त्यासाठी ३४ किलोमीटर लांब आणि १५ मीटर रुंद भूसंपादनाचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यासाठी सुमारे ३०७ कोटी रुपये खर्च लागणार आहे. अपघात टाळण्यासाठी बॅरिकेडिंग आवश्यक पाणी योजना महत्त्वाची आहे. सोबतच वाहनधारकांनाही त्रास होऊ नये यासाठी तात्पुरत्या स्वरूपात बॅरिकेडिंगचा निर्णय पोलिस, ‘एनएचएआय’, जीवन प्राधिकरण यांच्या अभ्यासातून घेतला आहे. बॅरिकेडिंग केल्यास अपघात होणार नाहीत, जलवाहिनीलाही धोका पोहोचणार नाही. भूसंपादन व वाढीव रस्त्यासाठीही पाठपुरावा सुरू आहे. - दिलीप गावडे, विभागीय आयुक्त रोज होणार कोंडी जलवाहिनी आणि रस्ता हा एकत्र असणे, असे कुठेही नाही. दोन्ही स्वतंत्र असावे जेणेकरून दुरुस्तीसाठी अडचण येणार नाही. या रस्त्यावरून रोज ४० हजारांपेक्षा अधिक वाहने ये-जा करतात. एकपदरी रस्ता असल्यास वाहतूक कोंडी अटळ आहे. दुसरा पर्यायी रस्ता व्यवहार्य नाही. प्रा. राजाराम दमगीर, वाहतूक अभ्यासक पैठणला जाण्यासाठी लागणार दुप्पट वेळ या रस्त्यावरून ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वाहने ये-जा करतात. एका बाजूने वाहतुकीसाठी एकपदरी रस्ता मिळाल्यास वाहनांचा वेग कमी होऊन ताशी ३० ते ४० किमीदरम्यान राहील. संभाजीनगर ते पैठण अंतर ५० किलोमीटर आहे. आता पोहोचण्यासाठी एक तास लागत असून, एकपदरी रस्ता झाल्यास दुप्पट वेळ लागणार आहे. दुसरा पर्यायी रस्ता पाचोडमार्गे असून, त्याचे अंतर सुमारे १०० किलोमीटर आहे. पैठण रोडवर जलवाहिनीच्या सुरक्षेसाठी रस्त्यावरील एका लेनवर बॅरिकेडिंग करण्यात येणार आहे. ही लेन वाहतुकीसाठी बंद असेल. बॅरिकेडिंगसाठी १५.१९ कोटी खर्च
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/OFhiMDY
पैठण रोडवर जलवाहिनीसाठी 34 किलोमीटर बॅरिकेडिंग:दीड वर्ष कोंडणार वाहतुकीचा श्वास, एका बाजूच्या रस्त्यावर दोनपैकी एकाच लेनवरून सुरू राहील वाहतूक
March 22, 2025
0