Type Here to Get Search Results !

औरंगजेबाच्या कबरीला टाळे लावण्यासाठी निघालेल्या तरुणाची जिल्ह्याबाहेर रवानगी:गनिमी काव्याने टाळे ठोकणारच, संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचा इशारा

खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला टाळे लावण्यासाठी मुंबईतून निघालेले छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे प्रमुख बाळराजे आवारे यांना शुक्रवारी दुपारी पोलिसांनी समृद्धी महामार्गावर अजिंठा इंटरचेंज येथे रोखले आणि त्यांची जिल्ह्याबाहेर रवानगी केली. आवारे यांच्या समर्थक राजश्री उंबरे यांना पोलिसांनी कुंभेफळ या ठिकाणी नजरकैदेत ठेवले होते. दरम्यान, पोलिसांनी कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी गनिमी काव्याने टाळे ठोकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा उंबरे यांनी दिला आहे. कबरीला टाळे लावण्याची मागणी काही दिवसांपूर्वी बाळराजे आवारे यांनी केली होती. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशाने त्यांना जिल्हाबंदी करण्यात आला होती. तरीही ते त्यांनी मुंबई येथून खुलताबाद येथे कबरीला टाळे लावण्यासाठी निघाले असता ग्रामीण पोलिसांनी त्यांना समृद्धी महामार्गावरील अजिंठा इंटरचेंज येथे अडवले. तेथे पोलिस व आवारे यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना जिल्ह्याच्या हद्दीबाहेर नेत सोडून दिले. त्यांच्या समर्थक राजश्री उंबरे यांना पोलिसांनी कुंभेफळ येथे नजरकैदेत ठेवण्यात आले होते. शुक्रवारी (२१ मार्च) दुपारी घडलेली ही घटना शनिवारी दुपारी समोर आली आहे. कबर हटवा : नाशिकच्या कार्यकर्त्याची हायकोर्टात याचिका औरंगजेबाची कबर काढून टाका, अशी याचिका नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते रतन लथ यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. पुरातत्त्व विभागाने या कबरीला दिलेला राष्ट्रीय विशेष दर्जा काढून टाकण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. ‘दिव्य मराठी’शी बोलताना लथ यांनी सांगितले की, मी हिंदू नाही, पण पारशी आहे. देशप्रेमी आहे. आवारे यांनी ११ मार्च रोजी औरंगजेबाच्या कबरीला टाळेबंद करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यांनी २३ मार्चचा अल्टीमेटम दिला होता. म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी आवारेंसह राजश्री उंबरे यांना ४ एप्रिलपर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्हाबंदी करत असल्याचे आदेश जारी केले होते. त्यानुसार आवारे व त्यांचे समर्थक जिल्ह्याबाहेर होते. त्यांनी शुक्रवारी जिल्ह्यात येण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी त्यांना जिल्हयाबाहेर नेत कारवाई केली. कबर हटवा : नाशिकच्या कार्यकर्त्याची हायकोर्टात याचिका औरंगजेब हा क्रूर होता. त्याने शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा छळ केला. त्या व्यक्तीच्या कबरीला राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा देणे चुकीचे आहे. या निर्णयामुळे देशप्रेमी मुस्लिम समाजही अडचणीत आला आहे. औरंगजेब याने चुकीच्या पद्धतीने राज्य केले. त्याच्यासाठी आपण भांडणे का करायची? तो आपला बादशहा नव्हता, मुळात तो आपला नव्हताच. त्याचा जन्म भारतात झाला असेल, तरी देशासाठी त्याने काहीही केले नाही. त्याचा इतिहास बघितला तर एकही चांगली गोष्ट त्याने केलेली नाही, असे लथ म्हणाले. दरम्यान, या याचिकेवर न्यायालय काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. औरंगजेबची कबर दर्गाह नाहीच लथ यांनी सांगितले की, दर्गाह आणि कबरीमध्ये मोठा फरक आहे, अजमेरचा दर्गाह किंवा हाजी अली बाबाचा दर्गाह जिथे हिंदू-मुस्लिम दोन्ही समाजाचे लोक जातात. मात्र, औरंगजेबची कबर हा दर्गाह नाही. तसेच, औरंगजेबच्या कबरीला विशेष दर्जा असल्यामुळे सध्या ही कबर काढणे शक्य नाही. मात्र हा दर्जा हटविल्यास महापालिका बुलडोझर लावून ती काढू शकते. गनिमी कावा करत कबरीला टाळे लावणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसा स्थळाचे संरक्षण करायचे सोडून सरकार औरंगजेबच्या कबरीचे संरक्षण करत आहे. ज्या राजाने क्रूरतेचे कळस गाठले त्यांची कबर याठिकाणी असण्याचे आणि त्यास इतके संरक्षण देण्याची काहीही गरज नाही. आम्ही कबरीला टाळे लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आम्ही गनिमीकावा करणार आहोत. -राजश्री उंबरे पाटील, सदस्य, छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान” पुणे : औरंगजेबाचा फोटो स्टेटसवर, दोघांविरुद्ध गुन्हा इन्स्टाग्राम स्टेटसवर औरंगजेबाच्या कबरीचा फोटो टाकून त्याखाली ‘उस बादशाह की क्या शान रही हाेगी जिसका नाम लेके आज तक लाेग सियासत करते हैं’ असे लिहिणाऱ्या सईद अमजद पठाण (रा.राजेवाडी, पुणे) याच्यासह अन्य एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/bALjyWi

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.