विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांची नियुक्ती करावी, असे शिफारसपत्र उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिले. ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना देण्यात आले. उद्धव ठाकरे विरोधी पक्षनेतेपदी आदित्य ठाकरेंची नियुक्ती करून घेण्याच्या बेतात आहेत, अशी खबर कळताच आमदार भास्कर जाधव फेब्रुवारीच्या प्रारंभी अस्वस्थ झाले होते. मग त्यांनी ‘उद्धवसेनेची अवस्था काँग्रेससारखी झाली आहे. माझ्या योग्यतेनुसार काम मिळालेले नाही’ अशी वक्तव्ये केली. शिंदेसेनेशी संपर्कही वाढवल्याची चर्चाही घडवून आणली. मातोश्रीवर आयोजित एका बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित राहणे टाळले. या दबावतंत्राचा त्यांना फायदा झाला. त्यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करावी, असे शिफारस करणारे पत्र उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले. हे पद महाविकास आघाडीतील शरद पवार गट किंवा काँग्रेससोबत अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याचा कोणताही फाॅर्म्युला ठरलेला नाही, असा दावाही उद्धव यांनी केला.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/WPuHrcl
विरोधी पक्षनेतेपदासाठी आ. भास्कर जाधवांची उद्धव ठाकरेंकडून शिफारस:शिंदेसेनेच्या संपर्कात असल्याची होती चर्चा
March 04, 2025
0