Type Here to Get Search Results !

पोलिस दलाकडून पोलिस उपनिरीक्षक इम्रान मुल्लाचे निलंबन,:काेल्हापुरात पहिली पत्नी असताना पोलिस उपनिरीक्षकाने केली 2 लग्ने

पत्नीला फसवून दोन लग्ने करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकाला कोल्हापूर पोलिसांनी गुरुवारी सेवेतून निलंबित केले. शिरोळ पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक इम्रान मुल्ला याच्या विरोधात त्याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे पोलिस उपनिरीक्षकाचे पहिले लग्न झाले असताना ती माहिती लपवून बेकायदेशीररीत्या दुसरे लग्न केले. सातत्याने वाद होत असताना तिसरे लग्न केले. बायकोने केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर पोलिसांनी मुल्ला याला निलंबित केले. पोलिस उपनिरीक्षक इम्रान मुल्ला याचा आफरीन मुल्ला यांच्याशी २०१९ च्या दरम्यान विवाह झाला. या वेळी इम्रान मुल्ला हा गोंदिया येथे सेवा बजावत असताना तक्रारदार आफरीन मुल्ला यांच्यासोबत सातत्याने वाद होत होते. शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याने आफरीन मुल्ला यांनी गोंदियातील केशारी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता. गुन्हा नोंद झाल्यानंतर इम्रान मुल्लाला सेवेतून निलंबित करण्यात आले होते. दरम्यान, पत्नी आफरीन मुल्ला यांनी पाठपुरावा केल्यानंतर २०१५ साली पोलिस उपनिरीक्षक इम्रान मुल्ला याचे पहिले लग्न झाले असल्याची माहिती मिळाली. मात्र कायदेशीररीत्या घटस्फोट न झाल्याची माहिती न देता इम्रान मुल्लाने आफरीन मुल्ला यांच्याशी विवाह केल्याचे समोर आले. दरम्यान, पोलिस आता त्याची व तिन्ही पत्नीची चौकशी करत असल्याचे सूत्रांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले. मुल्लाने चाैकशीत एक पत्नी मैत्रीण असल्याचे भासवले मुल्लाने इतक्यावरच न थांबता २३ जून २०२४ रोजी तिसरे लग्न केल्याची माहिती आफरीन मुल्ला यांना मिळाली. आपल्यासोबत कायदेशीररीत्या तलाक न झाल्याने त्यांनी कराड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, कोणतीही कारवाई होत नसल्याने अखेर माहितीच्या अधिकारात त्यांनी पोलिस प्रशासनाकडे पाठपुरावा केला. यानंतर इम्रान मुल्ला याच्याकडे चौकशी केली असता, सुहाना कुमार याच्याशी माझे लग्न झालेले नाही, ती माझी मैत्रीण आहे, असा खुलासा त्याने केला होता. तर आफरीन मुल्ला हीच आपली पहिली पत्नी असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. पण मुस्लिम कायद्यानुसार तिहेरी तलाकची कायदेशीर नोटीस पाठवून आपण लग्न केल्याची माहितीदेखील चौकशीदरम्यान इम्रान मुल्लाने दिली. तसेच एका प्रकरणात सुहाना कुमार यांनी इम्रान मुल्ला याच्याशी लग्न झाल्याची कबुली दिल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/wNqDzgx

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.