सातारा येथील पोवई नाका परिसरात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरा च्या समोरच्या बाजूस प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतमालाला हमी भाव मिळाला पाहिजे या व इतर मागणण्यांसाठी आज रात्री बारा वाजता आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी हातात फलक घेतले होते या फलकांवर शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, दिव्यांगांना आठ हजार रुपये मानधन मिळालेच पाहिजे , पेरणी ते कापणी पर्यंत ची सर्व कामे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत झाली पाहिजेत या मागण्या लिहिल्या होत्या. आंदोलक जसे रस्त्यावर फलक घेऊन आले तसे सातारा पोलिसांनी पोलिसांचा पिंजरा मागवुन प्रहार जनशक्ती पक्षाच्या 15 ते 20 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. सातारा पोलिस या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करतात की यांना ताब्यात घेऊन सोडून देतात हे अद्याप पोलिसांकडून स्पष्ट झालेले नाही. आंदोलन होणार हे पाहून सातारा पोलिसांनी मोठा बंदोबस्त पोवई नाका परिसरात तैनात केला होता ..तर प्रहारसोबत गाठ बच्चू कडू म्हणाले की, कर्जमाफीला सरकारकडे पैसे नाही, अपंगांना द्यायला पैसे नाही असे सरकार म्हणते. सरकारच्या धोरणामुळे शेतकर्यांचं नुकसान होत आहे. कोकाटे हे कृषीमंत्री आहेत ते शेतकऱ्यांचे पालक असून ते जर जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत असतील तर गाठ प्रहारसोबत आहे, हे लक्षात ठेवा. ज्या सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या घरातील दिवे विझायला लागले आहेत त्या सरकारविरोधात आमचे आंदोलन आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/pHlMeEt
प्रहारचे रात्री 12 वाजता शंभूराज देसाईंच्या घरासमोर आंदोलन:शेतमालाला हमीभाव द्या म्हणणाऱ्या 15-20 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
April 11, 2025
0