छत्रपती संभाजीनगर शहरात बनावट कागदपत्रांआधारे जन्मदाखला मिळवणाऱ्या व त्यासाठी अर्ज केलेल्या ८ संशयित बांगलादेशी घुसखोरांविरोधात सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभा-२०२४ निवडणूक प्रचार व आचारसंहिता काळात माेठ्या प्रमाणावर बाेगस जन्म दाखले दिल्याचे समोर आले आहे. याची चाैकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आतापर्यंत अशी २ लाख २३ हजार प्रकरणे उघडकीस आली, अशी माहिती भाजपचे वरिष्ठ नेते किरीट साेमय्या यांनी मंगळवारी दिली. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरात बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणी ८ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरात तहसीलदारांचे बनावट जन्म दाखले दिल्याप्रकरणी ४३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर दाेन वकिलांना अटक करण्यात आली. याप्रकरणी पाेलिस अधीक्षक आणि जिल्हा प्रशासनाची भेट घेऊन तपासाची माहिती घेण्यासह सूचना देण्यासाठी मंगळवारी साेमय्या जळगावात आले हाेते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ८० टक्के प्रकरणांत फक्त आधारकार्डाचा पुरावा राज्यात २ लाख २३ हजार बाेगस दाखल्यांची प्रकरणे समाेर आली आहे. त्यात ९७ टक्के मुस्लिम आहेत. त्यातील ८०% प्रकरणात पुरावा म्हणून फक्त आधारकार्ड जाेडण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यातील १० जिल्ह्यात १६ गुन्हे दाखल झाले आहेत. १७ वा गुन्हा मंगळवारी संभाजीनगरात दाखल होत आहे. बाेगस दाखल्यांप्रकरणी सिल्लोडला पोलिसांशी दीड तास चर्चा केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्राच्या १० जिल्ह्यांमध्ये अशा बाेगस दाखल्यांचा प्रकार समाेर आल्याने केंद्रीय जनगणना संचालकांनीही पत्र देऊन त्याबाबतची माहिती राज्य सरकारकडून मागवली आहे. फेब्रुवारी २०२४ ते ऑगस्ट २०२४ मध्ये अर्ज दाखल छत्रपती संभाजीनगरातील बनावट जन्मनोंदी प्रकरणात बनावट कागदपत्रांवर जन्म दाखला मिळवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी ८ जणांविरोधात सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यात मोहंमद जमील सिद्दिकी मोहंमद रशीद, मुजफ्फर अन्वर खान, नबी हबीब शेख, युनूस रफिक शेख, रिझवान खान अन्वर खान पठाण, सादिक हुसेन शेख, शाहेद सज्जाद शेख, मिर्झा अन्वर बेग अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी फेब्रुवारी २०२४ ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत उपविभागीय अधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केले होते.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/iVkj58s
संभाजीनगरात 8 संशयित बांगलादेशींवर गुन्हा:जन्मदाखल्यासाठी बनावट कागदपत्रे
April 08, 2025
0