अमरावती जिल्ह्यातील सुर्जी अंजनगावच्या देवनाथ मठाचे मठाधिपती परमपूज्य श्री जितेंद्रनाथ महाराज यांच्या मातोश्री कुसुमताई दत्तात्रेय लोमटे यांचे शनिवारी सकाळी ६.१२ वाजता निधन झाले. त्यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. कुसुमताई या धर्मशास्त्राच्या निपुण अभ्यासक होत्या. त्यांना ज्ञानेश्वरी मुखोद्गत होती. श्रीमद्भागवत आणि रामायणासह अनेक धर्मग्रंथांवर त्यांचा प्रभावी अभ्यास होता. श्री देवनाथ मठाचे माजी आचार्य समर्थ सद्गुरु श्री मनोहरनाथ महाराज यांच्या त्या प्रिय शिष्या होत्या. त्यांनी आयुष्यभर श्रीनाथपीठ श्रीदेवनाथ मठाची सेवा केली. अन्नदान आणि संतसेवा हे त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे पैलू होते. कारंजा लाडमध्ये राष्ट्रीय सेविका समितीच्या सक्रिय स्वयंसेविका म्हणून त्यांनी काम केले. त्या अमरावतीच्या राजापेठ विभागाच्या प्रभारी होत्या. दुपारी २ वाजता १९, सुभाष कॉलनी, छत्री तलाव रोड, फरशी स्टॉप येथून त्यांची अंत्ययात्रा निघाली. समाजातील सर्व स्तरांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. कुसुमताई यांच्या पश्चात ४ मुले, सुना, ३ मुली, जावई, नातवंडे व मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या निधनाने आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/CpKQJwk
अंजनगावच्या नाथ मठाचे आधारस्तंभ कालवश:मठाधिपती जितेंद्रनाथ महाराजांच्या मातोश्री कुसुमताई लोमटे यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन
April 12, 2025
0