घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. उज्ज्वला लाभार्थ्यांनाही याचा फटका बसणार आहे. उद्यापासून गॅस सिलिंडरच्या नवीन किमती लागू होतील. सामान्य जनतेच्या खिशाला मोठा भूर्दंड बसणार आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. भक्तांनी औरंगजेबाची कबर खणावी आणि असल्या निर्णयाचे स्वागत करावे, असा टोला ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी लगावला आहे. तर सरकारने आखलेल्या चुकीच्या धोरणांचे ओझे सामान्य माणसांवर आले, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. अंबादास दानवेंची सरकारवर टीका आज घरगुती गॅस 50 रुपयांनी वाढला. भक्तांनी औरंगजेबाची कबर खणावी. समाधी समाधी करावे आणि लोकांचे खिसे कापणाऱ्या या असल्या निर्णयाचे स्वागत करावे. बोला जय श्रीराम! जय जय श्रीराम! असे ट्विट विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. सामान्य माणसाचे कंबरडे मोडले जात आहे - जयंत पाटील आज सकाळीच शेअर मार्केट गडगडले आणि सामान्य मध्यमवर्गीय माणसाला त्याचा धक्का बसला. या धक्क्यातून सावरत नाही तोच आज केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर 2 रुपये एक्साईज ड्युटी वाढवली आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलही महाग होणार आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीतही 50 रुपयांची वाढ झाली आहे. उद्यापासून नवीन किमती लागू होणार आहे. सरकारने आखलेल्या चुकीच्या धोरणांचे ओझे सामान्य माणसाला हाकावी लागत आहे. त्यात सामान्य माणसाचे कंबरडे मोडले जात आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. सरकारी लूट तत्काळ थांबवावी - हर्षवर्धन सपकाळ क्रूड ऑईल 65 डॉलर आहे तरीही पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी केल्या जात नाहीत. युपीए सरकार असताना पेट्रोलवर 9.56 रुपये तर डिझेलवर 3.48 रुपये अबकारी कर (एक्साईज टॅक्स) होता, तो भाजप सरकारने वाढवत 32 रुपयांपर्यंत केला, काँग्रेसची पत्रकार परिषद सुरु असताना एक्साईज टॅक्स मध्ये आणखी 2 रुपयांची वाढ झाली. 1 रुपया रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस होता तो आता 18 टक्के केला आहे आणि वरून टोल वसुलीही सुरुच आहे, यातील काळेबेरे काय ते समोर आले पाहिजे तसेच कृषी सेस लावून केंद्र सरकार जनतेची लूट करत आहे. एलपीजी सिलिंडरसुद्धा 400 ते 450 रुपये होता तो आता दुप्पट झाला आहे. आजच एलपीजी सिलींडरच्या दरात 50 रुपयांची वाढ केली आहे, ही सरकारी लूट आहे, ती तात्काळ थांबवावी, असे काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. हे ही वाचा... पेट्रोलियम कंपन्यांच्या तोट्यामुळे गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या:50 रुपयांनी महागले, उज्ज्वला लाभार्थ्यांनाही फटका; उद्यापासून लागू, जाणून घ्या नवीन किमती घरगुती गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महाग झाला आहे. आज म्हणजेच सोमवार ७ एप्रिल रोजी पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ही माहिती दिली. सध्या दिल्लीत गॅस सिलिंडर ८०३ रुपयांना उपलब्ध आहे. किमती वाढल्यानंतर ही किंमत ८५३ रुपये होईल. तर मुंबईत हीच किंमत आधी ८०२.५० रुपये होती, ती आता ८५२.५० रुपये होईल. पूर्ण बातमी वाचा...
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/ehJUXKm
भक्तांनी औरंगजेबाची कबर खणावी:अन् खिसे कापणाऱ्या अशा निर्णयाचे स्वागत करावे, गॅस दरवाढीवरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
April 07, 2025
0