घोटी शहरातील एका खासगी विद्यालयातील आठवी, नववीच्या ५ ते ६ विद्यार्थ्यांच्या दप्तरात फायटर, चाकू, सायकलची चेन, लाेखंडी कडे, निरोध व अमली पदार्थ आढळले. उपमुख्याध्यापकांनी दप्तराची अचानक तपासणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. ही मुले नशाही करत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. याबाबत शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना शिक्षा देत थेट पालकांना शाळेत बोलावून समज व लेखी हमी घेतली आहे. यापुढे दरराेज दप्तराची तपासणी विद्यार्थ्यांच्या दप्तराची शाळेकडून राेज तपासणी केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या दप्तरात अशा काही वस्तू आढळ्यास पालक व पाेलिसांना बाेलावण्यात येणार असल्याचे शाळेकडून सांगण्यात आले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/CRjPSrk
उपमुख्याध्यापकांनी केली अचानक दप्तर तपासणी:नाशिकला आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात आढळले फायटर, चाकू, सायकलची चेन, कंडोमही
April 07, 2025
0