वैजापूर तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत रविवारी (२० एप्रिल) पहाटे आग लागल्याची घटना घडली. माजी उपसरपंच असलेल्याभरत कदम याने सरकारी कामासाठी आलेलेपैसे बनावट कागदपत्रांद्वारे लंपास केले होते.६५ लाखांच्या अपहारप्रकरणी त्यास सहामहिने तुरुंगवारी करावी लागली. या अपहाराचे सर्व पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने त्याने संपूर्णबँकच जाळून टाकण्याचा डाव आखत हाप्रताप केला. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने गुन्हा उघडकीस आणला. मुख्य आरोपी भरत शिवाजी कदम (रा.वीरगाव, ता. वैजापूर), अक्षय ज्ञानेश्वरकराळे (२८, रा. करंजगाव, ता. वैजापूर),सचिन सुभाष केरे (२५, गवळी शिवरा,ता.गंगापूर), वैभव उर्फ गजू पंढरीनाथ केरे (२७,रा.गवळी शिवरा, ता.गंगापूर), धारबा बळीरामबिराडे(३१, रा.अंधोरी, ता.अहमदपूर) यांनाअटक करण्यात आली आहे. अप्पा बालाजीबने हा अजूनही फरार आहे. कारला काळे स्टीकर लावून दिशाभूल करण्याचा डाव आरोपींनी या कारच्या छतावर काळ्या रंगाचेस्टीकर लावले होते. त्यामुळे सीसीटीव्हीच्याआधारे पोलिस तपास करत असताना काळ्याव पांढऱ्या रंगाच्या गाडीचा तपास करतील.गुन्हा झाल्यावर त्यावरील स्टीकरकाढल्यानंतर पूर्ण गाडीचा रंग बदलून जाईल,असा डाव होता. गाडीत वेगवेगळ्या शहरांच्यापासिंगच्या नंबर प्लेट आढळल्या होत्या.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/ckxMPvQ
वैजापूरच्या उपसरपंचाने घोटाळ्याचे पुरावे मिटवण्यासाठी बँक जाळली:महाराष्ट्र ग्रामीण बँक आग प्रकरणात पाच संशयितांना अटक
April 22, 2025
0