नीलेश चव्हाण शशांक हगवणे आणि वैष्णवी यांच्या लग्न बैठकीत सहभागी होता. तो दोघांच्या वादविवादात सक्रिय होता. तसेच, वैष्णवीचे सासरे राजेंद्र आणि दीर सुशील यांच्या मदतीने सासू लता आणि नणंद करिष्माचे मोबाइल त्याने पळवले आहेत. या आणि इतर कारणांमुळे नीलेश चव्हाण, राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना समोरासमोर बसवून चौकशी करायची असल्याचे बावधन पोलिसांनी न्यायालयात सांगितले. दरम्यान, नीलेश चव्हाण (४५, रा. औदुंबर सोसायटी, कर्वेनगर) याला नेपाळ सीमेवरून अटक करून शनिवारी न्यायालयात हजर केले. त्याला ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सासरे राजेंद्र हगवणे (५४) आणि सुशील हगवणे (२७, दोघेही रा. मुक्ताई गार्डनजवळ, भुकूम, मुळशी) यांच्या पोलिस कोठडीही ३ जूनपर्यंत वाढवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी दिले. सुपेकरांच्या पत्नीने घेतले वैष्णवीच्या आईकडून रुखवतासाठी दीड लाख वैष्णवीच्या शशांक हगवणेचे मामा आयपीएस जालिंदर सुपेकर यांच्यावरदेखील गंभीर आरोप करण्यात येत आहेत. सुपेकर यांच्या पत्नीने वैष्णवीच्या लग्नात रुखवत तयार केले होते. यासाठी त्यांनी वैष्णवीच्या कुटुंबाकडून १ लाख ५० हजार रुपये स्वीकारले असल्याचे समोर आले आहे. चव्हाणने इतरांच्या मदतीने केला वैष्णवीचा छळ नीलेश चव्हाणकडे परवानाधारक शस्त्र आहे. त्याचा वापर करून त्याने वैष्णवीला छळण्यासाठी धमकावल्याची शक्यता आहे. नीलेश चव्हाण हा वैष्णवीची नणंद करिश्माचा जवळचा मित्र आहे. त्याने इतर आरोपींच्या मदतीने कट रचून चिथावणी दिली. शशांक, सुशील आणि राजेंद्र हगवणे यांच्यासोबत नीलेश चव्हाणचे आर्थिक संबंध आहेत, याचा तपास करायचा आहे. वैष्णवीची सासू लता आणि नणंद करिष्मा हगवणेचा मोबाइल नीलेश चव्हाणकडे देण्यात आला होता. गुन्हा घडल्यानंतर तो नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, त्याला अटक केली.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/d98mQok
शशांक आणि वैष्णवी हगवणे यांच्या लग्न बैठकांपासून वादापर्यंत नीलेशचा सहभाग:हगवणे पिता-पुत्रासह नीलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलिस कोठडी
May 31, 2025
0