शिरपूरहून चोपड्याकडे दोन आयशर गाड्यांमधून एकूण १८ उंट कत्तलीसाठी जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानुसार चोपडा शहरातील गोरक्षकांना मिळाली होती. त्यांनी याबाबत चोपडा ग्रामीण पोलिसांनी माहिती दिली. त्यानुसार दोन्ही गाड्या गंलगी गावाजवळ थांबवल्या असता त्यात एकूण १८ उंट कोबलेल्या अवस्थेत मिळून आले आहेत. ही कारवाई १ जून रविवारी दुपारी १:१५ वाजता करण्यात आली. गोरक्षक जिग्नेश कँखरे,संग्राम परदेशी,पंकज नरवाडे,दीपक माळी, पप्पू बडगुजर, तुषार बडगुजर, पीयूष पाटील, भूषण भोई यांना चोपडा तालुक्यातील मध्य प्रदेशमधून निर्दयीपणे कोंबलेल्या अवस्थेत दोन आयशरमधून भरून उंट येत आहेत, अशी माहिती मिळाली होती. या गोरक्षकांनी ग्रामीणच्या पोलिसांना माहिती दिली आणि ग्रामीण पोलिसांनी त्या उंटांना आज जीवदान दिले आहे. दोन गाड्यांमधून एकूण १८ उंट हे कत्तलीसाठी मालेगावकडे जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी दिली आहे. शिरपूरहून चोपड्यात आयशर गाडी क्रमांक सीजी ०४ पीवाय-४०४३ व सीजी ०४ पीपी-४०४३ या दोन गाड्यांमधून हे उंट येत होते. यात हरी नायक मोतीलाल नायक (वय-३५) रा. खजराना रोशन नगर, इंदोर (मध्यप्रदेश), खालिद खान खलील खान (वय-४०), रा.नोशराबाद कॉलनी, देवास, (मध्यप्रदेश), सद्दाम फकरू बागवान (वय-३३) रा. कैसुर, जिल्हा धार हे दोघे आयशरमधून उंटांना निर्दयीपणे कोंबून घेऊन जात असताना गलंगी गावाजवळ एकूण ९ लाख रुपये किमतीचे एकूण १८ उंट आणि २० लाख रुपये किमतीचे दोन आयशर असा एकूण २९ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. सदर एकूण १८ उंटाना चोपडा शहरातील राम गोपाल गो शाळेत सोडवण्यात आले असून गोरक्षकांनी त्यांना चारापाण्याची व्यवस्था केली होती. पोलिस हेड कॉन्स्टेबल घनश्याम पवार यांच्या फिर्यादीवरून वरील तिन्ही आरोपींविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंध कायदा कलम १९६० चे कलम ११(१), (सी), (डी), ( ई), (एफ), महाराष्ट्र पशु स्वरक्षण अधिनियम कलम ५ ए बी, मोटर वाहन कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक शशिकांत पारधी करीत आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/g0I3zLY
कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या 18 उंटांची चोपड्यात सुटका:गोरक्षकांनी दिले पकडून, दोघांना अटक; 2 आयशरसह 29 लाखांचा मुद्देमाल जप्त
June 01, 2025
0