अड्याळ (भंडारा) : भंडारा जिल्ह्यात २६ व २७ में रोजी अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीचे पंचनामे गावातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांनी तात्काळ सुरू करून दिनांक ३० में पर्यंत कार्यालयात सादर करावी असे आदेश तहसीलदार महेंद्र सोनवणे पवनी यांनी काढताच अड्याळ येथे २९ में गुरुवारी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात पिकं पंचनामा, पाहणीसाठी जे अधिकारी कर्मचारी गेले तेही गहिवरले ! कारण अड्याळ व परिरात वरील दोन दिवसीय आलेल्या मुसळधार पावसामुळे तर शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झालेच परंतु मागील पंधरा दिवसात अवकाळी पावसाने अनेकदा हजेरी लावल्याने सुद्धा तोंडचा घास हिरावला गेला आहे. काहींच्या शेतात धान अंकुरले तर कडपा तशाच पडुन आहेत तर काहींच्या शेतात जमीन दोस्त झालेले धान पीक आहेत तशीच आहेत. धान पीक पंचनामा तथा पाहणी साठी शेतकऱ्यांनी सुद्धा उपस्थित अधिकाऱ्यांना मदत करावी असेही आवाहन यावेळी तालुका कृषी अधिकारी घोगरे यांनी केली आहे. आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील धान पिक जमीनदोस्त झाले आहेत आता त्याच धान्यातून हिरवेगार पिकं आले असल्याची सत्य स्थिती यावेळी शेतकऱ्यांनी दाखविली आहे. अनेक शेतकऱ्यांनी जीवाचे रान केले परंतू दुप्पट तिप्पट खर्च करून मळणी केली त्यातही शेतकरी भरडला गेला कारण अड्याळ येथे दोन दिवसच नव्हे तर अनेकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यातच शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी पंचनामा तथा पीक पाहणीसाठी आलेल्या अधिकारी कर्मचारी यांना आपली आपबिती सांगितली व बिकट परिस्थिती दाखविली असून ज्या शेतकऱ्यांनी शेतातील जमीन दोस्त झालेले धान्य कापुन मळणी केली त्याचे काय असाही सवाल येथे अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.अड्याळ व परिसरातील पिकं पाहणीचे दिवस दोनच दिवस असल्याने या दोन दिवसात संपूर्ण पाहणी होण्याची शक्यता नसल्याने दिवस वाढविण्याची मागणी सुद्धा यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/KLgk1e0