Type Here to Get Search Results !

मेळघाटच्या विकासासाठी महत्त्वाची पावले:३ जूनला होणार कृती आराखडा जाहीर; सीईओंनी केला गावागावांत दौरा

जिल्हा परिषदेच्या सीईओ संजीता महापात्र यांनी मेळघाटच्या विकासासाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत. आगामी ३ जून रोजी धारणी आणि चिखलदरा पंचायत समितीच्या खंड विकास अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत मेळघाटच्या सर्वांगीण विकासाचा कृती आराखडा तयार केला जाणार आहे. गेल्या शुक्रवारी सीईओ महापात्र यांनी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेसह मेळघाटचा दौरा केला. त्यांनी ३६ अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या गावांमध्ये मुक्कामासाठी पाठवले. स्वतः त्या चिखलदरा तालुक्यातील कुटीदा या दुर्गम गावात थांबल्या. त्यांनी गावकऱ्यांची बैठक घेऊन समस्या जाणून घेतल्या आणि विकासाचा रोडमॅप तयार केला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रिती देशमुख बिच्चूखेडा येथे, डेप्युटी सीईओ बाळासाहेब बायस रेहट्याखेडा येथे तर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड कुही गावात मुक्कामी होते. लघुसिंचन विभागाचे सुनील जाधव बोराट्याखेडा येथे आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुरुषोत्तम सोळंके खडीमल येथे थांबले होते. दौऱ्यानंतरच्या आढावा बैठकीत शिक्षण, आरोग्य, घरकुल, पशुसंवर्धन, वनहक्क आणि वनउपजांचा विनियोग यांसारख्या विषयांवर चर्चा झाली. रस्ते, पूल आणि शासकीय इमारतींच्या दुरुस्तीचाही आढावा घेण्यात आला. दोन्ही तालुक्यांच्या बीडीओंकडून सर्वंकष अहवाल मागवण्यात आला असून ३ जूनच्या बैठकीत त्यावर अंतिम निर्णय घेतले जाणार आहेत.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/v84Qwzg

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.