Type Here to Get Search Results !

धुणे धूताना वीज वाहिनी तुटून अंगावर पडली:12 वर्षीय मुलीचा मृत्यू, मसोड येथील घटना; वीज कंपनीवर निष्काळजीपणाचा आरोप

कळमनुरी तालुक्यातील मसोड येथे वीज वाहिनी तुटून अंगावर पडल्याने एका बारा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ता. 2 घडली आहे. या घटनेमुळे गावावर शोक काळा पसरली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील मसोड येथील वैष्णवी दुलाजी गोरे (१२) ही मुलगी आज दुपारच्या सुमारास तिच्या आईला धुणे धुण्यासाठी मदत करीत होती. दोघीही घरासमोरच धुणे धुत होत्या. यावेळी अचानक वीज वाहिनी तुटून खाली पडली. यामध्ये वीज प्रवाह होता. यावेळी वैष्णवीला विजेचा जोरदार धक्का बसला. सदर प्रकार तिच्या आईच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. परिसरातील गावकरी मदतीसाठी धावून आले. मात्र यावेळी तिच्याजवळच वीज वाहिनी तुटून पडल्याचे दिसून आल्यामुळे गावकऱ्यांनी तातडीने वीज कंपनीच्या कर्मचाऱ्याला माहिती दिली. वीज पुरवठा खंडित केल्यानंतर वैष्णवीला तातडीने उपचारासाठी कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची तपासणी केल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. या घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक मोहन भोसले, जमादार देविदास सूर्यवंशी, दिलीप पोले, प्रशांत शिंदे, गजानन होळकर यांच्या पथकाने तातडीने कळमनुरीच्या उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. तसेच पोलिसांनी घटनास्थळीही भेट दिली. दरम्यान मयत वैष्णवी ही इयत्ता आठवी वर्गात शिक्षण घेत होती. अभ्यासात हुशार व मनमिळाऊ मुलगी म्हणून तिची ओळख होती. तिच्या मृत्यूने मसोड गावावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. वीज कंपनीच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार झाल्याचा आरोप केला जाऊ लागला आहे. मान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे योग्य पद्धतीने केली नसल्यानेच हा प्रकार घडल्याचा आरोपही केला जात आहे. हे ही वाचा... कोविडची धास्ती:शासकीय रुग्णालयाने घेतली ऑक्सिजन यंत्राची चाचणी, तातडीची गरज भासल्यास शंभर बेड उपलब्ध केले जाणार हिंगोली जिल्ह्यात कोविडच्या पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालय प्रशासनाने सोमवारी तारीख दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. यावेळी ऑक्सिजन तयार करणाऱ्या यंत्रांची चाचणी घेण्यात आली असून तातडीची गरज भासल्यास 100 बेड वाढविता येणार आहेत. पूर्ण बातमी वाचा...

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/76lVw1r

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.