पुणे शहर, परिसरात गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे २० झाडे कोसळल्याची घटना घडली. तर मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर गुरुवारी रात्री नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेल्याची घटना घडली. नाल्यात वाहून गेलेल्या महिलेचा शोध लागलेला नाही. अग्निशमन दलाकडून महिलेचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवण्यात आली. शुक्रवारी सायंकाळपर्यंत महिलेचा शोध लागला नाही. शोभा मनोहर महिमाने (वय ६५ , दर्शन पार्क, फुरसुंगी, हडपसर) असे वाहून गेलेल्या महिलेचे नाव आहे. महिमाने कोल्हापूरला नातेवाईकांकडे गेल्या होत्या. गुरुवारी रात्री शहर परिसरात पाऊस झाला. बसने त्या मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर उतरल्या. नवले पूल परिसरातून त्या रस्ता ओलांडत होत्या. रस्ता ओलांडून त्या रिक्षाथांब्याकडे निघाल्या होत्या्. त्या वेळी तेथून वाहणाऱ्या पाण्यात त्या पडल्या. पावसामुळे नाल्याला पूर आला होता. नाल्यात पडून त्या वाहून गेल्या, अशी माहिती अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी दिली. नवले पूल परिसरातील नाल्याजवळ अंधार असल्याने गुरुवारी रात्री शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, अंधार असल्याने शोधमोहिमेत अडथळे आले. महिलेची चप्पल नाल्याजवळ सापडली. शुक्रवारी सकाळी या भागात पुन्हा शोधमोहीम राबवण्यात आली. सिंहगड रस्त्यावरील प्रयेजा सिटीपर्यंत नाला जातो. जवानांनी नाल्याच्या परिसरात शोध घेतला. मात्र, त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. पुणे शहरात २० ठिकाणी झाडे कोसळली पुणे शहर, परिसरात गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे २० झाडे कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाली नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.शहर, परिसरात गुरुवारी रात्री नऊनंतर पाऊस सुरू झाला. त्यानंतर सलग दोन तास जोरात पाऊस झाला. मध्यरात्रीपर्यंत पाऊस सुरू होता. पावसामुळे शहरातील वेगवेगळ्या भागात २० ठिकाणी झाडे कोसळली. पाषाण रस्त्यावरील पंचवटी परिसरात एक मोठे झाड मोटारीवर कोसळले. जवानांनी फांद्यांखाली अडकलेली मोटार फांद्या कापून बाहेर काढली. या भागातील रस्ता झाड पडल्यानंतर बंद झाला होता. जवानांनी फांद्या हटवून रस्ता वाहतुकीस खुला करुन दिला.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/iMzFQoG
पुण्यात पावसामुळे 20 ठिकाणी झाडे कोसळली:नवले पूल परिसरात 65 वर्षीय महिला नाल्यात वाहून गेली, शोधकार्य सुरू
June 13, 2025
0