अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यात बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात पोलिसांनी सापळा रचून दोन लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या. त्यानंतर टेंभुर्णी (ता. माढा)येथे नोटा तयार केल्या जाणाऱ्या घरावर राहुरी पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत एकूण ६६.३१ लाखांच्या ५०० व २०० रुपयांच्या बनावट नोटा, नोटा छापण्यासाठी वापरले जाणारे साहित्य, दुचाकी जप्त करण्यात आली आहे. अहिल्यानगरात शनिवारी मध्यरात्री व रविवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. पप्पू ऊर्फ प्रतीक भारत पवार (३३, रा. अर्जुननगर, ता. करमाळा, जि. सोलापूर), राजेंद्र कोंडीबा चौघुले (४२, रा. पाटेगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर), तात्या विश्वनाथ हजारे (४०, रा. पाटेगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या पथकाने ही कारवाई केली. जळगावात दोघांना अटक : ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या जळगावातील सचिन राजपूत (३४, रा. जळगाव) व सचिन गोसावी (२३, रा. रुख्मिणीनगर, जळगाव) यांना रविवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६ हजार मूल्याच्या ५०० रुपयांच्या १२ बनावट जप्त केल्या. त्यांनी ३० हजार रुपयांच्या बनावट नोटा छत्रपती संभाजीनगर येथून आणल्या. यातील २४ हजार जळगावात खर्च केले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/PrQa5fH
अहिल्यानगर, जळगावात बनावट नोटांचे रॅकेट उघड:दोन्ही घटनांत सुमारे 67 लाखांच्या बनावट नोटा जप्त
June 29, 2025
0