नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे शुक्रवारी दुपारी एक भीषण अपघात घडला. मुंबई-आग्रा महामार्गावरील पेट्रोल पंप चौफुलीवर रस्ता ओलांडत असलेल्या तीन महिलांना ट्रकने चिरडले. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. सर्व महिला मालेगावच्या सोयगाव येथील रहिवासी असल्याचे समजते. प्राथमिक माहितीनुसार, तीनही महिला लासलगाव येथे आपल्या नातेवाईकांच्या घरी तेराव्याच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. तेराव्याचा कार्यक्रम आटोपून मालेगावला जाण्यासाठी त्या चांदवड बस स्थानकावर पोहोचल्या. त्यानंतर त्या बस स्थानकावरुन मालेगावकडे जाणाऱ्या बस ज्या बस स्टॉपवर येतात त्या ठिकाणी जाण्यासाठी त्या रस्ता ओलांडत होत्या. रस्ता ओलांडत असताना मनमाडच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने या तिन्ही महिलांना चिरडले मनमाडच्या दिशेने येणाऱ्या अवजड ट्रक क्रमांक MH 19 CY 9313 ने तीन महिलांना चिरडले. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटना सीसीटीव्हीत कैद या अपघातात गुणमाला श्रीपाद पहाडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुशीला श्रीपालचंद पहाडे आणि अनिता विनोद पहाडे या दोघी गंभीर जखमी असून त्यांना तातडीने उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही संपूर्ण दुर्घटना पेट्रोल पंपजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून अपघाताचे दृश्य अत्यंत हृदयद्रावक आहे. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अपघाताचा व्हिडिओ या घटनेनंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अपघातात नाशिकच्या उद्योगपतीचा मृत्यू दरम्यान, समृद्धी महामार्गावर इगतपुरीजवळ मर्सिडीज कारच्या भीषण अपघातात नाशिक येथील उद्योगपती सुनील हेकरे यांचा मृत्यू झाला. बुधवारी ही घटना घडली. सुनील हेकरे हे मुंबईहून नाशिककडे येत होते. इगतपुरीच्या बोगद्याजवळ आले असता त्यांच्या कारने तीनवेळा पलटी घेतली आणि सुनील हेकरे गाडीतून बाहेर फेकले गेले. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी आणि दोन मुले गंभीर जखमी झाले. अपघाताचे कारण महामार्गावर साचलेले पाणी असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली नसल्याने मृत्यू झाल्याचा आरोप हेकरे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/bImA0iB
नाशिकच्या चांदवडमध्ये अवजड ट्रकने तीन महिलांना चिरडले:एकीचा मृत्यू, दोघी गंभीर जखमी; तेराव्याचा कार्यक्रम आटोपून घरी निघाल्या होत्या
June 27, 2025
0