नाशिक येथे २०२७ मध्ये कुंभमेळा होत आहे. लाखो भाविक नाशकात येतील. याच वेळी शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज २ लाख भाविक येण्याची शक्यता आहे. या भाविकांचा प्रवास सुकर व्हावा अन् सुलभ दर्शन घेता यावे यासाठी साईबाबा संस्थानने १९० कोटींचा विशेष विकास आराखडा तयार केला आहे. लवकरच त्यानुसार विकासकामांना प्रारंभ होईल, असे साईबाबा संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ५ लाखांचे विमा कवच देण्यात आले आहे. अपघात झाल्यास ही रक्कम मिळते. मात्र त्यासाठी भाविकांनी दर्शनासाठी वेबसाइटवर आगाऊ नोंदणी आवश्यक आहे. मोफत जर्मन भाषा प्रशिक्षण साईबाबा संस्थानच्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांना जर्मन भाषा शिकवली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना जर्मनमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. संस्थान भरते विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी शैक्षणिक संकुलातील ११वी व १२वीच्या विद्यार्थ्यांना फक्त ३५ हजारात शिक्षणासह सीईटी कोचिंग दिले जात आहे. यातील ५०% फी संस्थान भरते, तर ९०% गुण मिळवणाऱ्यांना किंवा एकल पालक असलेल्या ८०% गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची पूर्ण फी संस्थानकडून भरली जाते. ग्रीन एनर्जीवरील पहिले स्वयंपूर्ण धार्मिक स्थळ साई संस्थानचा विजेसाठी २१ कोटी खर्च करावे लागतात. पवन ऊर्जा, सौरऊर्जा प्रकल्प उभारून १०० टक्के स्वयंपूर्ण होईल. ग्रीन एनर्जीवरील हे पहिले स्वयंपूर्ण धार्मिक स्थळ असेल. तसेच भाविकांच्या सोयीसाठी रेल्वेस्टेशन व संस्थानच्या गेटवरच किओस्क मशीन बसवण्यात आले आहेत. त्यातून सशुल्क दर्शन व आरती पास उपलब्ध होतात. तिरुपतीत केशदान, शिर्डी येथे रक्तदान संस्थानने आय बँक सुरू केली.तिरुपतीमध्ये केशदान, तर शिर्डीत रक्तदान करण्यात येते. ४ महिन्यांत ५ हजार भाविकांनी रक्तदान केले. हे प्रमाण वाढत आहे. -गोरक्ष गाडीलकर, सीईओ, साईबाबा संस्थान साईभक्तांना या मिळणार सुविधा प्रसादालय : अतिरिक्त १ लाख भाविकासांठी मोफत प्रसाद. निवास : तात्पुरती निवास व्यवस्था, निवारा शेड. तेथेच भोजन पार्किंग: रोबोटिक पार्किंग. ४०० चारचाकी, ८०० दुचाकींची व्यवस्था रस्ते : पार्किंगकडे जाण्यासाठी रस्ते व परिक्रमा मार्ग विमानसेवा : ७०० कोटींच्या अत्याधुनिक टर्मिनलला मंजुरी.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/xzfELkA
दिव्य मराठी ब्रेकिंग:कुंभमेळ्याआधी शिर्डीचा 190 कोटींतून विकास, भक्तांसाठी 5 लाखांचे विमा कवच
June 27, 2025
0