संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आचार्य पदवी कोर्स वर्क परीक्षा १३ जुलै रोजी होणार आहे. ही परीक्षा सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत घेण्यात येईल. विद्यापीठाने प्रत्येक जिल्ह्यात एक परीक्षा केंद्र नियुक्त केले आहे. अमरावतीत विद्याभारती महाविद्यालयात परीक्षा होईल. अकोल्यात सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात परीक्षा घेतली जाईल. बुलडाणा जिल्ह्यातील खामगावमधील जी.एस. विज्ञान कला व वाणिज्य महाविद्यालय हे परीक्षा केंद्र असेल. यवतमाळमध्ये अमोलकचंद महाविद्यालय आणि राजस्थान आर्यन कला मिठूलालजी कचोलिया वाणिज्य महाविद्यालयात परीक्षा होईल. वाशिम येथे सत्यनारायणजी रामकृष्णजी राठी विज्ञान महाविद्यालयात परीक्षा घेतली जाईल. परीक्षेचे प्रवेशपत्र संशोधन केंद्राच्या लॉगीन आयडीमध्ये ५ जुलैपर्यंत उपलब्ध होतील. परीक्षेच्या एक तास आधी प्युस सॉफ्टवेअरमधून प्रश्नपत्रिका ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या जातील. परीक्षा केंद्राधिकारी आणि सहकेंद्राधिकारी यांना प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्सची जबाबदारी दिली आहे. विद्यार्थ्यांचे गुण १४ ते २१ जुलैदरम्यान संशोधन केंद्राच्या लॉगीन आयडीमध्ये भरावे लागतील. ऑफलाईन गुण स्वीकारले जाणार नाहीत. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांनी सर्व संबंधितांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी आचार्य कक्षाच्या उपकुलसचिव मिनल मालधुरे यांच्याशी संपर्क साधता येईल.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/Lm2fADv
अमरावती विद्यापीठाच्या पीएचडी कोर्स वर्क परीक्षेची तयारी पूर्ण:13 जुलैला परीक्षा, प्रत्येक जिल्ह्यात एक परीक्षा केंद्र नियुक्त
July 01, 2025
0