सूतगिरणी चाैकात गुरुवारी (३ जुलै) मध्यरात्री दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. काही वेळातच परिसरात शेकडोंचा जमाव जमला होता. हाणामारीत दोघे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या राड्यात एका पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती आहे. रात्री उशिरापर्यंत जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. रात्री उशिरा दाेन्ही गटातील नेते-कार्यकर्ते जमा झाले हाेते. मध्यरात्री मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एक गट सूतगिरणी चौकात जमला होता. त्या वेळी तेथून जाणाऱ्या एका गाडीचा धक्का लागला. त्यावरून दोन्ही गटांमध्ये वाद सुरू झाला. शाब्दिक वाद वाढत गेला आणि काही वेळातच परिसरात शेकडोंचा जमाव जमला होता. त्यानंतर गस्तीवर असलेल्या दोन पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी प्रयत्न केला. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त मागवून जमाव पांगवला. हाणामारीत जखमी झालेल्या मुलाला घाटी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची माहिती मिळताच पाेलिसांच्या दाेन लहान व्हॅन व एक माेठी व्हॅन सूतगिरणी चाैकात दाखल झाली. त्यापाठाेपाठ पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार जवाहरनगर पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. हा प्रकार खासदार संदिपान भुमरे यांच्या संपर्क कार्यालयाजवळच घडला. रात्री नेमके काय घडले हे तपासण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या चित्रीकरणाची मदत घेण्यात येणार आहे. ताब्यात घेतलेल्या काही जणांकडून धारदार शस्त्रे जप्त एकाच वेळी शेकडोंचा जमाव जमल्याने जवाहरनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ताब्यात घेतलेल्या काही जणांकडून धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनीदेखील पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. ठाण्याच्या बाहेरदेखील रात्री उशिरापर्यंत मोठा जमाव जमलेला होता.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/m2saSAc
सूतगिरणी चौकात मध्यरात्री वाद:दुचाकीचा धक्का लागल्यावरून संभाजीनगरात 2 गटांत हाणामारी, दाेन जण गंभीर जखमी, शेकडोंचा जमाव जमला
July 03, 2025
0