हिंगोली तालुक्यातील कनेरगावनाका येथे तीन दुकानांना शनिवारी ता. १२ रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागून दुकानातील साहित्य जळून खाक झाले आहे. यामध्ये लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज असून हिंगोली व वाशीम येथील अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविले. शॉर्ट सर्किटमुळे हि आग लागल्याचे बोलले जात आहे. याबाबत गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कनेरगाव नाका येथे अनिल वानखेडे यांचे आचल बुट हाऊस, नितीन पठाडे यांचे फोटो स्टुडिओ तर विष्णू मुळे यांचे एक सलूनचे दुकान आहे. आज रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास आचल बुट हाऊस या दुकानाला अचानक आग लागली. बघता बघता आगीने रौद्र रुप धारण केल्याने आगीची झळ फोटो स्टुडिओ व कटींग सलूनच्या दुकानाला पोहोचली. या तीनही दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. आगीवर नियंत्रण मिळवेपर्यंत साहित्य खाक या आगीची माहिती मिळताच गणेश गावंडे, सुरेश गावंडे, सुमीत घुगे, जुबेर पठाण, सचिन पठाडे, शुभण, नेमाडे, शुभम गोडघासे, साईराज घोडकर, हनुमान गावंडे, मंगेश गावंडे, बालाजी गावंडे, गणेश महाले, मिथून घेवारे यांनी घटनास्थळी जाऊन आगीवर पाणी ओतण्यास सुरवात केली. मिथून घेवारे यांनी त्यांच्या ट्रॅक्टरद्वारे पाणी आणून आगीवर पाणी टाकले. त्यानंतर हिंगोली पालिका व वाशीम अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण मिळविले. तो पर्यंत तीन दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. दरम्यान, घटनास्थळी बासंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास आडे, उपनिरीक्षक मदन गव्हाणे यांच्या पथकाने भेट दिली आहे. या शिवाय महसूल विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी सायंकाळी उशीरापर्यंत बासंबा पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही. शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज दरम्यान, याबाबत गावकऱ्यांनी सांगितले की, दुपारी दोन वाजता वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यानंतर रात्री साडेआठ वाजता वीज पुरवठा सुरु झाली. मात्र यावेळी दोन वेळा वीज पुरवठा चालुबंद झाल्यामुळेच शॉर्ट सर्किट होऊन आग लागली असण्याची शक्यता आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/j0o1r4c
कनेरगाव नाका येथे आगीत 3 दुकाने खाक:लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज, शॉर्ट सर्किटने आग लागल्याची शक्यता
July 12, 2025
0