सलग चौथ्या दिवशी म्हणजे २६ जुलै रोजी राज्यभर पावसाने हजेरी लावली. विदर्भ, मराठवाडा, पुणे, महाबळेश्वर, कोकणात त्याचा जोर अधिक होता. शनिवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत राज्यात सर्वाधिक ७१ मिमी पाऊस परभणीत झाला. छत्रपती संभाजीनगरात ३१ मिमीची तर बीड जिल्ह्यात २१.३ मिमी नोंद झाली. महारेन या राज्य सरकारच्या वेबसाइटवरील नोंदीनुसार १ जून ते २६ जुलै या कालावधीत ४८५.१ मिमी पाऊस अपेक्षित आहे. प्रत्यक्षात ४५७.८ मिमी पाऊस झाला. म्हणजे ९४.४ टक्के पाऊस झाला असून अपेक्षित आकडा गाठण्यासाठी फक्त ६ टक्के पाऊस होणे बाकी आहे. विदर्भात जोरदार पावसामुळे गोसेखुर्द प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे अर्ध्या मीटरने तर नांदेडला विष्णुपुरी प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले. त्यातून ३९,७९४ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. हिंगोलीतील भंडारी गावाजवळ पाच गावांचा संपर्क तुटल्याने ४० शालेय विद्यार्थिनी ४ तास अडकून पडल्या होत्या. चाळीसगावला २४ तासांत ६५ मिमी पाऊस झाला. पाटणादेवीला चंडिकामाता देवी मंदिरात गेलेले ३० ते ४० भाविक सुमारे ३ तास अडकले होते. प्रमुख शहरांत पाऊस २६ जुलै स. ८.३० ते सायं. ५.३० मुंबई ०१ मिमी नागपूर २४ मिमी संभाजीनगर ३१ मिमी नाशिक १२ मिमी जळगाव १६.५ मिमी सोलापूर २.६ मिमी अहिल्यानगर ०.८ मिमी अकोला १३.९ मिमी बीड २१.३ मिमी चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी परिसरात गेल्या २४ तासांत सुमारे ६५ मिमी पाऊस झाला. पाटणादेवी येथील चंडिकामाता मंदिरात गेलेले ३० ते ४० भाविक अडकले होते. त्यांना मदत पथकाने ३ तासांनंतर बाहेर काढले. मध्य महाराष्ट्रात आज ऑरेंज, विदर्भात यलो अलर्ट विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत रविवारीही पावसाची हजेरी असेल. पुणे, अहिल्यानगरात ऑरेंज अलर्ट आहे. जायकवाडी धरणाचे दरवाजे कधीही उघडणार जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ८०.७२ टक्के झाला आहे. धरणात पाण्याची आवक सुमारे १८ हजार क्युसेक असून ती वाढू शकते. त्यामुळे कडा प्रशासनाने धरणाचे दरवाजे केव्हाही उघडले जातील. सतर्क राहा, असा इशारा गोदावरी नदीपात्राच्या दुतर्फा गावांना दिला आहे. माजलगाव धरणासाठी जायकवाडीतून साडेदहा टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/Y4FAy7R
आबादानी:जायकवाडी 81 टक्के भरले, संभाजीनगरात 31 मिमी पाऊस, 1 जून ते 26 जुलै पावसाची तूट 6% बाकी
July 26, 2025
0