प्रेयसीसोबत दिवसभर फिरल्यावर रात्री वाद झाला. त्याच रागातून प्रियकराने मध्यरात्री अडीच वाजता तिचे डोके दगडावर आपटले. त्यात बेशुद्ध झाल्याने त्याने तिला तेथेच घाटात फेकून दिले. हा सर्व प्रकार करून आरोपी सुनील सुरेश खंडागळे (१९, रा. लाखणी मांडकी, ता. वैजापूर) शिऊर पोलिस ठाण्यात हजर होऊन हत्येची कबुली दिली. दीपाली गणेश आस्वार (२३, सासरचे नाव - दीपाली शंकर त्रिभुवन) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास निरीक्षक रेखा लोंढे करत आहेत. अधिक माहितीनुसार, आरोपी सुरेश खंडागळे याचे दीपालीसोबत अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. तिला भेटण्यासाठी वडिलांची दुचाकी घेऊन तो कन्नड येथे गेला होता. दिवसभर फिरल्यानंतर काही कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादात दीपालीचे डोके दगडावर आपटून तिची हत्या केली. त्यानंतर दौलताबाद घाटात ढकलून दिल्याची कबुली त्याने शिऊर पोलिसांत दिली.शिऊर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक वैभव रणखंब यांनी दौलताबाद पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर दौलताबाद पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने शोध मोहीम राबवून तरुणीचा मृतदेह बाहेर काढला. पतीपासून विभक्त असलेली दीपाली राहत होती आजीकडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दीपाली गणेश आस्वार हिचे लग्न पाच वर्षांपूर्वी शंकर त्रिभुवन (रा. लोणवा, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) याच्यासोबत झाले होते. त्यांना दोन वर्षांची मुलगी आहे. परंतु दीपाली गेल्या सहा ते सात महिन्यांपासून पतीपासून वेगळी तिच्या आजीकडे राहत होती. तिची दोन वर्षांची मुलगी वडिलांकडे राहते. दरम्यान, २३ जुलै रोजी दीपाली अंधानेर (ता. कन्नड) येथे लहान बहिणीला भेटायला गेली होती. दुसऱ्या दिवशी (२४ जुलै) रात्री नातेवाईक व प्रियकर सुनील खंडागळे याच्यासोबत अंधारी येथील लहान बहिणीच्या घरून अब्दीमंडीकडे येण्यास निघाली असताना रात्री अडीच ते तीन वाजेदरम्यान दौलताबाद घाटात पोहोचताच दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून त्याने हत्या केली.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/hHYn7ym
मृत महिला विवाहित, आरोपीची स्वत: सकाळी पोलिस ठाण्यात कबुली:दिवसभर फिरले, मध्यरात्री प्रेयसीचा डोके फोडून दौलताबाद घाटात फेकून देत खून
July 25, 2025
0