महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. २५ मिनिटे चाललेल्या या भेटीने राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा सुरू झाली आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांच्या काही मंत्र्यांची खाती बदलली जाणार असे म्हटले जात आहे. विधिमंडळ अधिवेशनात मोबाईलवर रमी खेळताना आढळल्याचा आरोप असलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे रडारवर आहेत. तशी तयारी सुरू असल्याची माहिती खुद्द कोकाटेंचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचा विचार होऊ शकतो, असे वक्तव्य केले. विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकरांच्या जागेवर विदर्भातील नाराज नेते सुधीर मुनगंटीवार विधानसभा अध्यक्ष होतील. नार्वेकरांंना मंत्रिपद दिले जाणार, अशी जोरदार चर्चा आहे. मात्र, काही राजकीय अभ्यासकांच्या मते महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर फार मोठे बदल होण्याची शक्यता नाही.मुंडेंचा घेतला होता राजीनामा : सरपंच संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणात विरोधकांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले. अनेक आंदोलने झाली. त्यामुळे अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला. तसाच निर्णय कोकाटेंविषयी होऊ शकतो. या 4 कारणांनी बदल अशक्य 1. विरोधकांना आयते कोलीत 2. मित्रपक्षांमध्ये तणाव वाढेल 3. मनपा निवडणूक महत्त्वाची 4. बदलासाठी ठोस कारण नाही या 4 कारणांनी बदल शक्य 1. सरकारच्या प्रतिमेला धक्का 2. सरकार शेतकरीविरोधीची चर्चा 3. मंत्र्यांवर वचक दाखवून द्यायचे 4. दिल्लीश्वरांचे आदेश आहेत. धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्री करण्याचा विचार : भुजबळ पुणे येथे मंत्री भुजबळ म्हणाले की, धनंजय मुंडेंना कृषी खात्यातील आरोपांसंदर्भात क्लीन चिट मिळाली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा मंत्रिपदाचा विचार होऊ शकतो. मंगळवारी कोकाटेंविषयी निर्णय घेईन : अजित पवार चव्हाणच्या मारहाणीनंतर घाटगेंनी अजित पवारांची भेट घेतली. सोमवारी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मंगळवारी कोकाटेंविषयी निर्णय घेईन, असे अजित पवार म्हणाले. मुनगंटीवार विधानसभा अध्यक्ष, धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होण्याचे संकेत कोकाटेंचा वाद काय? 1. विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल. 2. शासन भिकारी आहे, असे वक्तव्य केले. (याशिवाय संजय शिरसाट योगेश कदम गिरीश महाजन मेघना बोर्डीकर यांच्याविषयीही वाद सुरू आहे.)
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/PgVbzNr
उलथापालथीचे संकेत:फडणवीस-शहा 25 मिनिटे भेट; राज्यात कॅबिनेट बदलाची चर्चा, युतीतील काही मंत्र्यांची खाती बदलणार!
July 25, 2025
0