लाेणावळा शहरात तीन जणांनी अपहरण करून कारमध्ये सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार एका तरुणीने लाेणावळा पाेलिसांत दिल्याने खळबळ उडाली हाेती. परंतु पाेलिसांच्या तपासात संबंधित तरुणीचे तिच्या प्रियकरासाेबत भांडण झाल्यानंतर त्याचा गैरफायदा घेत तरुणीला दिलासा देण्याच्या बहाण्याने जवळच्याच कॅफेचालकाने तरुणीशी ओळख काढून तिच्यावर कारमध्ये जबरदस्तीने बलात्कार केल्याचा प्रकार पाेलिस चाैकशीत समाेर आला आहे. तसेच पीडित तरुणीने पालकांच्या भीतीने सामूहिक बलात्कराची तक्रार दिल्याची कबुली पाेलिसांकडे दिली असून ३ आराेपी या घटनेत नसून एकच आराेपी असल्याचेदेखील आता स्पष्ट झाले आहे. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, २५ जुले राेजी रात्री लाेणावळयातील तुंगार्ली भागातील नारायणी धाम मंदिर परिसरातील रस्त्याने पायी जाताना एका कारमध्ये ताेंड दाबून जबरदस्तीने तिघंनी अपहरण करून त्यानंतर कारमध्येच रात्रभर वारंवार सामूहिक बलात्कार केला आणि आणि २६ जुलै राेजी पहाटे रस्त्याच्या कडेला गाडीतून फेकून दिल्याची तक्रार तिने लाेणावळा पोलिसांत दिली होती. या गंभीर घटनेमुळे संपूर्ण पुणे ग्रामीण पाेलिस दलाची यंत्रणा कामाला लागली आणि पाेलिसांनी तपास सुरू केला. घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत पाेलिसांनी आराेपीचा माग काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर संबंधित कारचादेखील शाेध सुरू करत सनील वसंत गायकवाड (३५,रा. तुंगार्ली, ता.मावळ,पुणे) या आराेपीस अटक केली. आराेपीच्या चाैकशीत अशी माहिती माहिती समाेर आली की, पीडित तरुणी ही लाेणावळा ग्रामीण परिसरातील मध्यमवर्गीय कुटुंबातील असून ती लाेणावळयात एका ठिकाणी नाेकरी करते. घटनेच्या दिवशी तिचे प्रियकरासाेबत वाद झाले हाेते आणि तिच्या इतरदेखील तक्रारी असल्याने ती निराश झाली हाेती. कॅफेचालक असलेला आराेपीने तिला हेरले व तिच्याशी ओळख काढून तिला गाेड बाेलून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तरुणीने तिच्या सर्व समस्या त्याच्याकडे मांडल्या. याचा गैरफायदा घेत त्याने तिला घरी साेडण्याचा बहाणा करून कारमध्ये बसवून कारमध्येच तिच्यावर बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले. लाेणावळा पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या मार्गदर्शनात लाेणावळा पाेलिस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, याप्रकरणाचा पोलिस आणखी सखाेल तपास करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. गोऱ्हेंच्या प्रतिनिधींकडून तरुणीची भेट तरुणीवरील बलात्कार या संतापजनक घटनेची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली असून त्यांच्या सूचनेनुसार, त्यांच्या कार्यालयातील प्रतिनिधींनी पीडित तरुणीची भेट घेऊन तिला मानसिक आधार देत, आवश्यक ती मदत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. पोलिस यंत्रणेने रात्रीच्या वेळेस निर्जन भागात अधिक गस्त वाढवणे, तसेच शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी कार्यक्षम सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करून त्याचे नियंत्रण केंद्र सुनिश्चित करणे, महिला सुरक्षिततेसाठी कार्यरत हेल्पलाइन क्रमांक अधिक सक्रिय व परिणामकारक करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. तसेच इतर सूचनाही त्यांनी या वेळी केल्या. आरोपी व पीडितेची ओळख नव्हती पुणे ग्रामीण पाेलिस अधीक्षक संदीपसिंग गिल म्हणाले, या प्रकरणात पाेलिसांनी संबंधित आराेपी सनील गायकवाड यास अटक केली असून त्याच्याकडे सखाेल चाैकशी करण्यात आली आहे. आराेपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल असून पीडितेने या प्रकरणात चाैकशीत एकच आराेपी असल्याचे सांगितले आहे. पीडिता व आराेपी यांची घटनेच्याच दिवशी ओळख झालेली हाेती. त्यांच्यात पूर्वीची ओळख नव्हती. त्यानंतर सनील याने तरुणीवर अत्याचार केला. आता तरुणीच्या मित्राचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत असले तरी त्याची कधी चौकशी होईल, याबाबत अजून स्पष्टता नाही.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/iCXAI3q
बलात्कार करणारे तीन नसून एकच मुख्य आरोपी:प्रियकरासाेबत वाद झाल्यानंतर ‘त्या’ तरुणीवर कॅफेचालकाचा बलात्कार
July 28, 2025
0