छत्रपती संभाजीनगरच्या गरुडझेप अकॅडमीचे संचालक नीलेश सोनवणे यांनी रजिस्ट्रीचा खर्च वाचवण्यासाठी केलेला गैरप्रकार समोर आला आहे. आधी त्यांनी वाळूजची शेतजमीन अकृषक (एनए) केली. नंतर ती विकताना तलाठ्याच्या प्रमाणपत्रात रिकाम्या जागेवर “अकृषक झालेली नाही’ असे लिहिले. दुय्यम निबंधकाने दुर्लक्ष करत रजिस्ट्री करून दिल्याचे दिव्य मराठी इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर आले. डिसेंबर २०२२ मध्ये सोनवणेंनी वाळूजच्या गट क्र. २१ मधील २.४५ हेक्टर आर (२४,५०० चौ.मी) जमीन एनए केली. २०२४ मध्ये ती विकण्यासाठी तलाठ्यांनी २ मे २०२४ ला पाहणी करत जमिनीवर बांधकाम नसून ती पडीत असल्याचे प्रमाणपत्र दिले. यातील रिकाम्या जागेवर “तसेच अकृषक झालेली नाही’ हे ४ शब्द जोडल्याची कागदपत्रे दिव्य मराठीकडे उपलब्ध आहेत. तलाठ्यांनी पत्र पाठवून तालुका दुय्यम निबंधकांना केले होते सावध तलाठ्याचे पत्र मिळताच सोनवणेंनी जमीन विक्रीसाठी खरेदीखत केले. प्रमाणपत्रात छेडछाडीची माहिती तलाठ्यांना समजली. त्यांनी ९ मे २०२४ रोजी पत्राद्धारे गंगापूरच्या रजिस्ट्री कार्यालयातील दुय्यम निबंधक रसूल यांना ही बाब कळवत सावध केले. चौकशी करून खरेदीखत रद्द करावे आणि सोनवणे यांच्यावर कारवाईची शिफारस केली. काहीही चुकीचे केलेले नाही उपलब्ध कागदपत्रांनुसार रजिस्ट्री केली. शासनाचा महसूल बुडवला नाही. -मोहंमद रसूल, दुय्यम निबंधक, रजिस्ट्री कार्यालय, गंगापूर दोषींकडून फरकाची रक्कम वसूल करू विवेक गांगुर्डे, सहनिबंधक वर्ग-१, संभाजीनगर दुय्यम निबंधकांनी तलाठ्याच्या पत्राकडे दुर्लक्ष केले का? -होय. त्यांनी तलाठ्याचे पत्र बघायला हवे होते. रसूल यांनी रेडीरेकनरप्रमाणे रजिस्ट्री केली नाही. हे चुकीचे नाही? -होय, चुकीचेच आहे. जमीन मूल्यांकनानंतर फरक वसूल करू. रसूल, सोनवणेंवर कारवाई करणार का? तुमच्या पत्रावरही कारवाई झालेली नाही? -रसूल असो किंवा सोनवणे, दोघांवरही नियमानुसार कारवाई होईल. माझ्या पत्रावर अहवालाची वाट बघतोय. शेतीला विकली म्हणून पुन्हा अकृषक केली नाही नीलेश सोनवणे, संचालक, गरुडझेप अकॅडमी, वाळूज एनए जमीन कृषक म्हणून विकली? -येथे अकॅडमीची इमारत बांधण्याचा विचार असल्याने एनए केले. विचार बदलल्याने ती पडून होती. शेतीसाठीच विकल्याने पुन्हा कृषक करण्याची गरज नाही. रजिस्ट्रीचा खर्च वाचवण्यासाठी हा खटाटोप केला.? -कागदपत्रे तपासून रजिस्ट्री केली. नियमानुसार शुल्क भरले आहे. तलाठ्याच्या प्रमाणपत्रात छेडछाड केली ? -मी काहीही केलेले नाही. अन्य कुणी केले असेल. 1 रसूल यांनी तलाठ्याच्या पत्राकडे कानाडोळा करत १५ सप्टेंबर २०२४ ला जमीन विक्रीची रजिस्ट्री करून दिली. 2 २.४५ हेक्टर आर अकृषक जमिनीचे रेडीरेकनरप्रमाणे ७ ते ८ काेटी मूल्य होते. त्यावर सुमारे ४० लाख रुपये मुद्रांक शुल्क लागते. 3 तलाठ्याच्या पत्रात एक ओळ घुसवून ती कृषक दाखवली. यामुळे जमिनीचा रेडी रेकनरचा दर २.५ कोटी झाला. 4 रसूल यांनी २.५ कोटींवर रजिस्ट्री केल्याने नोंदणी व मुद्रांक असा ९० हजार खर्च लागला. शासनाचा तब्बल ३९ लाख महसूल बुडाला.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/kTSUBY1
दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:रजिस्ट्री खर्च वाचवण्यासाठी एनए जमीन दाखवली कृषक, गरुडझेप अकॅडमीचे सोनवणे यांचा गैरप्रकार, दुय्यम निबंधकांची डोळेझाक
July 29, 2025
0