वाघांची घटती संख्या जगभरासाठी चिंतेचा विषय असला तरी छत्रपती संभाजीनगर मनपाला त्यांच्या संख्यावाढीची भीती वाटते. यामुळेच ‘वाघांचे शहर’ अशी ओळख असणाऱ्या संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात वाघांची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी त्यांचे फॅमिली प्लॅनिंग केले जात आहे. अपुऱ्या जागेमुळे प्राणिसंग्रहालयाला मिटमिटा येथे १४५ कोटी खर्च करून तयार होत असलेल्या झूलॉजिकल पार्कमध्ये स्थलांतरित करावयाचे आहे, मात्र १० वर्षांनंतरही येथील कामेच पूर्ण झालेली नाहीत. मानसिकतेवर परिणाम वाघ लैंगिकदृष्ट्या उपेक्षित राहिला तर त्याच्या मानसिकतेवर परिणाम होतो. वागणुकीत बदल होतात. ते चिडचिडे होतात. याचा त्यांच्या खाण्यापिण्यावरही दुष्परिणाम होतो. डॉ. एनएस कदम, सहा. आयुक्त,पशुसंवर्धन सीझेडचा नियम काय? सेंट्रल झू अथॉरिटीच्या नियमानुसार एका जोडप्याला १ हजार चौरस मीटरमध्ये ठेवावे लागते. सिद्धार्थमध्ये १ हजार, १,८०० व ७०० चौरस मीटरमध्ये १२ वाघांना ठेवण्यात आले आहे. नर-मादीला ठेवतात वेगळे सिद्धार्थ उद्यानात वाघांची संख्या वाढू नये म्हणून नर व मादीला वेगवेगळ्या पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात येते. याशिवाय सकाळी नर आणि मादीला टप्प्याटप्प्याने मोकळ्या पिंजऱ्यात सोडण्यात येते. त्यांना एकत्र सोडण्यात येत नाही. अशी वाढली वाघांची संख्या देशभरात पाठवले १९ वाघ : बोरिवली प्राणिसंग्रहालय टाटा झू जमशेदपूर चतबीर झू पंजाब इंदूर मुकुंदपूर मध्य प्रदेश पुणे जिजामाता उद्यान मुंबई अहमदाबाद येथे १९ वाघ पाठवले आहेत.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/VpykNb7
दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:जगाला चिंता वाघ घटण्याची, पण... ‘सिद्धार्थ’मध्ये वाघांचे ‘फॅमिली प्लॅनिंग’!
July 16, 2025
0